दरोड्यातील आरोपीच्या नातेवाईकाने घातली पोलिसांच्या अंगावर मोटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:15+5:302021-05-12T04:12:15+5:30

बाभूळगाव : टेंभुर्णी (ता. माढा, ता. सोलापूर) हद्दीत दरोडा टाकून ३ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी सुगाव (ता. इंदापूर) येथील ...

A relative of the accused in the robbery threw a car at the police | दरोड्यातील आरोपीच्या नातेवाईकाने घातली पोलिसांच्या अंगावर मोटार

दरोड्यातील आरोपीच्या नातेवाईकाने घातली पोलिसांच्या अंगावर मोटार

Next

बाभूळगाव : टेंभुर्णी (ता. माढा, ता. सोलापूर) हद्दीत दरोडा टाकून ३ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी सुगाव (ता. इंदापूर) येथील राहत्या घरातून अटक केली. त्याला टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस गाडीचा पाठलाग करून त्यांच्या मोटारीला पाठीमागून धडक देेेत मारण्याचा, तसेच आरोपीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ११) माळवाडी नं.१ (ता. इंदापूर) येथे घडली आहे. या घटनेत टेंभुर्णीचे सहायक पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दत्तू नारायण सावंत, रोहन दत्तू सावंत, अमोल दत्तू सावंत, ऊर्मिला दत्तू सावंत, शर्मिला दत्तू सावंत, सुरेखा दत्तू सावंत (सर्व रा. सुगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहे. योगेश रावसाहेब चितळे (वय ३२) टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी अमोल सावंत याने टेंभुर्णी, सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून तो गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. टेंभुर्णी पोलीस त्याच्या शोधात होते. आरोपी हा सुगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. टेंभुर्णी पोलिसांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला सुगाव येथील त्याच्या राहत्या घरी छापा टाकून अटक केली. त्याला परत घेऊन टेंभुर्णी पोलीस इंदापूरकडे खासगी वाहनाने जात असताना पाठीमागून एक एक्सयुव्ही मोटार (एमएच १२ एएच २५१५) पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत आली. माळवाडी नं. १ येथे पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, याचवेळी अमोल सावंत याला मोटारीतील आरोपींनी पोलिसांच्या ताब्यातून सिनेस्टाईलने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मोटारीतील आरोपींनी पोलिसांच्या गाडीला पाठीमागून चार ते पाचवेळा जोराची धडक दिली. यात पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला व गाडीतील सहायक पोलीस निरीक्षकासह तिघे जखमी झाले.

आरोपी अमोल सावंत याने फिर्यादीच्या उजव्या बरगडीत मारून फिर्यादींना जखमी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक भोसले यांना आरोपीच्या नातेवाईकांनी छातीवर मारहाण केली. आरोपीच्या वडिलांनी गाडी चालवत असणारा त्यांचा मुलगा रोहन सावंत यास जोरात गाडी चालवून पोलिसांना मारण्यास सांगितले. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह तिघेजण जखमी झाले. या वेळी आरोपींच्या मोटारीची एअर बॅग उघडल्याने गाडी बंद पडली. यामुळे पोलीस बचावले. पोलिसांनी यानंतर सर्वांना अटक केली. त्यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, टेंभुर्णी पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल सावंत याला अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यला ५ दिवसांची कोठडी दिली.

फोटो ओळी...माळवाडी नं. १, ता. इंदापूर येथे टेंभुर्णी पोलिसांच्या वाहनावर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला करून वाहनाची झालेली दुर्दशा.

Web Title: A relative of the accused in the robbery threw a car at the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.