लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या नातेवाईकांची मुलाच्या आईवडिलांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:34 PM2022-06-28T15:34:29+5:302022-06-28T15:34:46+5:30

लिव्ह इन मध्ये राहत असताना मुलाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तिने व तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह नातेवाईकांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार मांजरी येथे घडला

Relatives of a young woman living in a live in beat up the boy parents | लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या नातेवाईकांची मुलाच्या आईवडिलांना बेदम मारहाण

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या नातेवाईकांची मुलाच्या आईवडिलांना बेदम मारहाण

Next

पुणे : लिव्ह इन मध्ये राहत असताना मुलाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तिने व तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह नातेवाईकांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार मांजरी येथे घडला. याप्रकरणी मांजरीतील महादेवनगर येथे राहणाऱ्या एका ५२ वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माधुरी व तिची आई, वडिल, मनोज पाटील, आकाश राऊत, रामदास लोहकरे (सर्व रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी, दोन मुली व मुलासह मांजरीत गेल्या तीन वर्षापासून राहतात. त्यांचा २३ वर्षाचा मुलगा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असून तो गेल्या दीड वर्षापासून माधुरी या तरुणीबरोबर लिव्ह इनमध्ये रहात आहेत. २३ जून रोजी त्या दोघांमध्ये भांडणे झाल्याने माधुरी तिच्या माहेरी निघून गेली. त्यांचा मुलगा कामाला गेला असताना शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता माधुरी त्याचे आई वडिल व इतर नातेवाईकांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आली. बोलायचे असल्याचे सांगून घरात शिरले. त्यांनी घरातील सर्वांना मारहाण केली. त्यांच्या पत्नीच्या पोटात एकाने लाथ मारली. त्यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या मुलीने भावाला बोलावून घेतले. पोलिसांना कळविले. तिचा भाऊ आला असताना त्यालाही त्यांनी मारहाण करुन ते कारमधून पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

Web Title: Relatives of a young woman living in a live in beat up the boy parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.