बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:37+5:302021-07-11T04:08:37+5:30
यावेळी व्यसनमुक्त युवक संघ इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सुदीप ओहोळ, ह.भ.प.तानाजी पांडुळे, वंचित बहुजनचे सागर गायकवाड, वारकरी ह.भ.प.संतोष कांबळे, निलकंठ ...
यावेळी व्यसनमुक्त युवक संघ इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सुदीप ओहोळ, ह.भ.प.तानाजी पांडुळे, वंचित बहुजनचे सागर गायकवाड, वारकरी ह.भ.प.संतोष कांबळे, निलकंठ कदम, विठ्ठल शिंगटे, हनुमंत कदम, अतुल भोसले, अनिल निकम, ईश्वर फलफले, ह.भ.प.सदाशिव गलांडे, बाळासाहेब नरळे, विष्णुदास गलांडे, हनुमंत सपकळ, दत्तु जाधव, हनुमंत कांबळे, प्रमोद चव्हाण, पवन पवार, सचिन मोहिते, प्रताप मोहिते, सतिश बाबर, संजय मोरे, हनुमंत नरुटे उपस्थित होते.
बंदी असतानाही पायी वारी करणाऱ्या हभप बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्यांना अपमानास्पद वागणूक देत जेवण दिले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त रामानंद पोकळे, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेतून सन्मानाने मुक्त करावे, अन्यथा वारकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील, असा इशारा व्यसनमुक्त युवक संघ व वारकरी संघ तसेच वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्याकडून इशारा देण्यात आला आहे.
१० इंदापूर निवेदन
इंदापूर येथे पोलीस ठाण्यात निवेदन देताना वारकरी संप्रदायातील वैष्णव.