जनाई योजनेतूून उन्हाळी आवर्तन तातडीने सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:12 AM2021-04-04T04:12:00+5:302021-04-04T04:12:00+5:30
या परिसरातील बहुतांश गावांना मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच या भागात मागील वर्षीपासून उसाचे क्षेत्र ...
या परिसरातील बहुतांश गावांना मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच या भागात मागील वर्षीपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उसाला पाणी कमी पडत आहे. येथील ऊस तुटून गेल्यावर मोठ्याप्रमाणात खोडवा ऊस राखल्याने पाण्याची आवशकता निर्माण झाली आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा पिके घेतली आहेत. मात्र विहिरी, बोअरवेलचे पाणी निघाल्याने काही पिके जळुन जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनाईतुन पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सोमेश्वरचे संचालक गणेश चांदगुडे यांनी दिली.