भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:23 PM2018-02-21T18:23:09+5:302018-02-21T18:31:38+5:30

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे.

release water from Bhama Aaskhed; Damage to the electricity pumps of some farmers | भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

Next
ठळक मुद्देपाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसाननदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे

आंबेठाण : भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसान झाले. तर नदीला पाणी आल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
भामा आसखेड धरणातून मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या दोन दरवाजांतून ६०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून पाणी सोडण्याचा वेग वाढवून तो ९५० करण्यात आला. त्यामुळे नदीपात्र भरून वाहत होते. या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे दुसरे आवर्तन असून दहा दिवस चालणार आहे.
पाणी सोडण्याअगोदार दोन ते तीन तास पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, असे पिंपरी खुर्द आणि गोनवडी गावच्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र अचानक नदीतील पाणीत वाढ झाल्याने विजपंप नदीपात्रातून वर काढता आले नाही. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे विजपंप चालू होते. त्यामुळे  विजपंपात पाणी गेल्याने विजपंप जळून गेले आहेत. त्यामुळे नदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाणी सोडण्यासाठी एक व चार नंबरचे दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत. पाणी सोडण्यास सुरुवात करण्याआगोदर धरणातील पाणीसाठा ८४.११ टक्के होता. तर पाणी पातळी ६६९.१६ मीटर इतकी होती. आजपर्यंत धरण परिसरात १२९२ मिली पावसाची नोंद झाली आहे.सध्याच्या दुसऱ्या आवर्तनात भीमा आणि भामा नदीवरील एकूण असणारे १८ बंधारे भरले जाणार आहेत.
धरणातील पाण्याचा फायदा खेड तालुक्यातील करंजविहिरे, आसखेड खुर्द, शेलू, भांबोली, वराळे, सावरदरी, कुरकुंडी, धामणे, कोये, किवळे, चांदूस, पिंपरी ब्रुदुक, रोहकल, भाम, गोणवडी, बोरदरा, पिंपरी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी ब्रुदुक, काळुस, भोसे व शेलगाव अशा अनेक गावातील शेतीपिकांना व गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडण्यात आल्याने भामानदी काठावरील गावच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: release water from Bhama Aaskhed; Damage to the electricity pumps of some farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे