नीरा कालव्याला पाणी सोडा : हर्षवर्धन पाटील
By admin | Published: March 25, 2017 03:41 AM2017-03-25T03:41:45+5:302017-03-25T03:41:45+5:30
नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न
बावडा : नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर उपाय म्हणून तातडीने नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये नीरा डावा व उजवा या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
नीरनिमगाव येथे शुक्रवारी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील, इंदापूर पंचायत समितीचे सभापती करण घोलप व उपसभापती देवराज जाधव, माळशिरस पंचायत समितीचे सभापती वैष्णवी मोहिते पाटील व उपसभापती किशोर सूळ,
तसेच पंचायत समिती सदस्या रोहिणी घोगरे यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती करण घोलप, अर्जुन मोहिते-पाटील, उपसभापती देवराज जाधव यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास लालासाहेब पवार, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, महादेव घाडगे, श्रीमंत ढोले, रणजित रणवरे, दादासाहेब घोगरे, प्रल्हाद शेंडे, संजय बोडके, नामदेव किरकतआदी उपस्थित होते.(वार्ताहर)