लिफ्टमधून महिलांची सुटका

By admin | Published: May 12, 2017 05:36 AM2017-05-12T05:36:36+5:302017-05-12T05:36:36+5:30

वेळ सायंकाळी ७.३५ची.. ठिकाण रविवार पेठेतला आनंद मॉल. नेहमीच गर्दीने फुललेला परिसर... मॉलची लिफ्ट अचानक बंद पडली

Release of women from lift | लिफ्टमधून महिलांची सुटका

लिफ्टमधून महिलांची सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वेळ सायंकाळी ७.३५ची.. ठिकाण रविवार पेठेतला आनंद मॉल. नेहमीच गर्दीने फुललेला परिसर... मॉलची लिफ्ट अचानक बंद पडली आणि आत फसलेल्या आठ महिलांची भीतीने घाबरगुंडी उडाली... कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले आणि जवानांनी महिलांना सुखरूपपणे बाहेर काढले.
मॉलच्या पाच मजली इमारतीत दोन लिफ्ट कार्यान्वित आहेत. क्षमता ही दोन किंवा तीन व्यक्तींची आहे. मात्र क्षमतेपेक्षा जास्त महिला लिफ्टमध्ये आल्याने लिफ्ट अचानक तळ आणि पहिल्या मजल्याच्या मध्ये बंद पडली. पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र रस्ते अरूंद आणि खरेदीसाठी असलेली गर्दी यामुळे दलाच्या जवानांना आत शिरणे शक्य झाले नाही. अखेर चालत ते घटनास्थळी गेले. लिफ्टच्या दरवाजाची चावी आणि कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडण्यात आला. थोडी जागा झाल्यानंतर कंट्रोल पॅनेलद्वारे लिफ्ट खाली आणण्यात आली, असे प्रकाश गोरे यांनी सांगितले.

Web Title: Release of women from lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.