हवेलीतील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा, प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 06:21 PM2021-04-23T18:21:03+5:302021-04-23T18:22:05+5:30

दौंड आणि हवेली तालुका प्रशासनाचे ऑक्सिजन निर्मितीवरून झाले होते वाद

Relief for coronary patients in Haveli, administration seizes 11 metric tonne capacity oxygen production project | हवेलीतील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा, प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प घेतला ताब्यात

हवेलीतील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा, प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प घेतला ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देहवेली तालुक्यातील सर्व रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला

लोणी काळभोर: कोरोनाच्या महामारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार कदमवाकवस्ती येथील खासगी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प हवेली तालुका प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. यामुळे हवेली तालुक्यातील सर्व रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला असून ही बाब हॉस्पिटल व रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे.

पाच दिवसांपुर्वी दौंड व हवेली तालुका प्रशासन यांच्यामध्ये यवत येथील गुरुदत्त एटंरप्रायझेस या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पावरुन वाद झाले होते. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळीच हस्तक्षेप केल्याने दौंड व हवेली तालुक्यातील रुग्णालयांसाठी समन्वयाने ऑक्सिजन वाटपाचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी प्रविण सांळुखे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे व महसूल पथकाने नुकतेच कदमवाकवस्ती येथील पुणे एअर प्रॉडक्ट हा ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना ताब्यात घेतला आहे. यावेळी महसूल नायब तहसिलदार संजय भोसले, हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, तलाठी दादासाहेब झंजे, राजेश दिवटे उपस्थित होते. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ११ मेट्रिक टन आहे. या प्रकल्पामुळे हवेली व पुणे जिल्ह्यातील इतर भागांतील रुग्णालयांना आवश्यक तो ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

हवेली तालुक्याचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे म्हणाले, दौंड तालुक्यातील यवत येथील गुरुदत्त एटंरप्रायझेस या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून दौंड व हवेलीतील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी प्रविण सांळुखे व प्रांताधिकारी सचिन बारवकर यांचे सुचनेनुसार कदमवाकवस्ती येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून सध्यस्थितीत दैनंदिनी ६ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. हवेलीमधील हॉस्पिटलच्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा होत असून शिल्लक असलेला साठा इतर तालुक्यातील रुग्णालयांना पुरवणार आहे. हे काम महसूलच्या समन्वय समिती मार्फत सुरू आहे.

Web Title: Relief for coronary patients in Haveli, administration seizes 11 metric tonne capacity oxygen production project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.