पुणेकरांना दिलासा! शहरातील तापमानात किंचित घट; तरीही दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:23 PM2023-04-23T12:23:43+5:302023-04-23T12:23:51+5:30

येत्या २३ ते २६ एप्रिल दरम्यान पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Relief for the people of Pune A slight drop in temperature in the city Still appeal not to step out of the house in the afternoon | पुणेकरांना दिलासा! शहरातील तापमानात किंचित घट; तरीही दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

पुणेकरांना दिलासा! शहरातील तापमानात किंचित घट; तरीही दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

googlenewsNext

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. किमान तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात होते. तसेच किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही गरमी जाणवत आहे. येत्या तीन-चार दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली होती. दरम्यान, शनिवारी कमाल तापमानात किंचित घट झाल्याचे दिसून आले. शहरातील कमाल तापमान ३५ अंस सेल्सिअस होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला.

येत्या २३ ते २६ एप्रिल दरम्यान पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून, हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे. दुपारी आकाश निरभ्र राहणार आहे, तर सायंकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेला होता. दिवसा प्रचंड उकाडा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात दररोज दुपारी प्रचंड उष्णता आणि सायंकाळी पावसाची हजेरी याचा अनुभव पुणेकरांनी घेतला. शहरात अनेक ठिकाणचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस नोंदवले जात होते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडल्यानंतर अनेकांना उष्माघाताचा फटका बसला. 

दरम्यान, शहरात गुरुवारी दुपारी कडका होता. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही भागांत गाराही पडल्या. त्यामुळे काही भागांत वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

दि. २१ ते २५ एप्रिलदरम्यान पुण्यात आकाश निरभ्र राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. मेघगर्जना व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने सांगितला आहे.

शनिवारी शहरातील कमाल तापमान

शिवाजीनगर : ३४
लोहगाव ३५.३
लवळे : ३६.२
मगरपट्टा ३५.७

Web Title: Relief for the people of Pune A slight drop in temperature in the city Still appeal not to step out of the house in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.