इंदापूरकरांना दिलासा, महिन्यानंतर रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:45+5:302021-06-03T04:08:45+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही संक्रमण वाढले होते. दरम्यानच्या काळात शहरी भागातील बाधितांच्या ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही संक्रमण वाढले होते. दरम्यानच्या काळात शहरी भागातील बाधितांच्या संख्येत घट होऊ लागली; पण ग्रामीण भागातील आलेख चढताच होता. मे महिन्यात सातत्याने रुग्णसंख्या दोनशेहून अधिक राहत होती. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालिका प्रशासन हतबल झाले होते. लसीकरण व आरोग्य तपासणीबाबत नागरिकांना जागृत करूनही दिलासा मिळत नव्हता. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे प्रयत्न करूनही दिवसाआड रुग्ण वाढतच होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यानंतर मंगळवारी रुग्ण नोंदीने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. दैनंदिन ३०० पर्यंत रुग्णसंख्या व पाचपेक्षा जास्त बळी जात असतानाच आज एका मृत्यूची नोंद झाली असून, रुग्णसंख्या ग्रामीण २९ व शहरी ५ वर आली आहे.
इंदापूर तालुक्यात आजअखेर ग्रामीण भागात १३ हजार ९१३ तर, शहरी भागात २ हजार २९० रुग्ण असून, एकूण १६ हजार २०३ रुग्ण बाधित झाले असून, त्यातील ३७९ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर आज अखेर १५ हजार १३१ रुग्ण बरे करून घरी सोडले आहेत.