आजपासून शहरात निर्बंधांमध्ये सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:34+5:302021-08-15T04:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य शासनाने ११ आॅगस्ट रोजी लॉकडाऊनमधील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य शासनाने ११ आॅगस्ट रोजी लॉकडाऊनमधील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचे आदेश काढले होते़ याची अंमलबजावणी आजपासून (रविवार, दि.१५) शहरात होणार असल्याचे आदेश महापालिकेने शनिवारी जारी केले आहेत़ त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. चित्रपटगृहे, मंदिरे अजूनही बंदच ठेवण्यात येणार आहेत.
पुणे महापालिका हद्दीसह पुणे व खडकी कॅंटोंमेंट बोर्डाच्या हद्दीत निर्बंधातील शिथिलतेचे आदेश १५ आॅगस्टपासून लागू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे़ यामुळे आजपासून शहरातील व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, लग्न सोहळे, दुकाने, हॉटेल्स, खासगी कार्यालये आदींना मोठा दिलासा मिळाला आहे़ मात्र ही शिथिलता देण्यात आली असली तरी शासनाने यामध्ये दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे़
स्