उरले फक्त ९.६२ टक्के पाणी

By admin | Published: May 31, 2016 02:23 AM2016-05-31T02:23:05+5:302016-05-31T02:23:05+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८० टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Remaining only 9.62 percent of the water | उरले फक्त ९.६२ टक्के पाणी

उरले फक्त ९.६२ टक्के पाणी

Next

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८० टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याने तसेच जूनअखेरीस पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडावे लागणार असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या असून, जून महिन्यात पावसाला सुरुवात न झाल्यास शहरातील पाणीकपात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पालिकेकडूनही कपातीबाबत विचार सुरू करण्यात आला असून, जून महिन्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पातळी मेअखेरीस अवघ्या ९.६२ टक्क्यांवर आली आहे. या प्रकल्पात पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर ही ४ धरणे असून, त्यांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने आॅक्टोबर २०१५अखेर या धरणांत केवळ ५० टक्के साठा होता. त्यानंतर पुणे शहर व जिल्ह्यातील गावांसाठी पाण्याचे नियोजन केल्यानंतर ३० मेअखेर धरणसाठा २.८० टीएमसीवर पोहोचलेला आहे. केवळ शहरासाठी पाणी राखीव ठेवल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी दरमहा १ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, ते राखीव ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत शहराला पुरेल एवढे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.त्यातील जवळपास 0.३0 टीएमसी पाणी धरणसाठा म्हणून शिल्लक ठेवावा लागणार असल्याने तसेच दोन टाऊनशिपसाठीही पाणी सोडावे लागणार आहे. तर काही पाण्याचे बाष्पीभवन होईल.पालखी सोहळा जूनअखेरीस पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्याच्या हद्दीतून पुढे जाताना कालव्यातून पाणी सोडण्यात येते.

Web Title: Remaining only 9.62 percent of the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.