कोरोना संकटात युवकांचे उल्लेखनीय कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:32+5:302021-01-13T04:22:32+5:30

पुणे: कोरोना संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची काळजी घेणे, संचारबंदीत प्राण्यांना जेवण देणे, समाजसेवेसाठी सक्षम राहणे अशी ...

Remarkable performance of youth in the Corona crisis | कोरोना संकटात युवकांचे उल्लेखनीय कामगिरी

कोरोना संकटात युवकांचे उल्लेखनीय कामगिरी

Next

पुणे: कोरोना संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची काळजी घेणे, संचारबंदीत प्राण्यांना जेवण देणे, समाजसेवेसाठी सक्षम राहणे अशी कर्तृत्ववान कामे करून युवक असल्याचे महत्व समाजाला पटवून दिले आहे.

गेल्या वर्षी कोरोनासारखे महाभयानक संकट जगावर आले होते. ते अजूनही पूर्णपणे संपले नाही. या संकटात डॉक्टर, पोलीस, आरोग्य अधिकारी, कचरा वेचक, आणि महानगरपालिका कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करत होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था, मंडळे यात सहभागी झाले होते. कोरोनाच्या संचारबंदीत अनेक युवकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन समाजसेवेचा विडा उचलला. त्या पार्श्वभूमीवर काही युवकांशी लोकमतने संवाद साधला.

कोरोना संकटात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

डॉ. सिद्धी राजहंस यांनी कोरोनाच्या संचारबंदीत एप्रिलमध्ये कामाला सुरुवात केली. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यातील रेड झोन भागामध्ये दारोदारी जाऊन स्क्रिनिंगला सुरुवात केली. त्या भागात जाऊन लोकांची तपासणी केली.

होमिओपॅथी, रोगप्रतिकारकशक्ती आणि आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले. नागरिकांना चाचणी करण्याची गरज भासल्यास चाचणी करण्यास पाठवले. त्यानंतर कोव्हिडं केअर सेंटरमध्ये इतर आजार असणारे व साध्या रुग्णांकडे लक्ष देणे. त्याच्या ऑक्सिजन लेव्हल, तापमानाची तपासणी करणे. ते पाहून औषधे देणे. अशी जवळपास सहा महिने कामे केली.

कोव्हिडं केअर सेंटरमध्ये बहीण - भाऊ दोघेही कार्यरत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून गरवारे कोव्हिडं केअर सेंटरमध्ये सिद्धी आणि शुंभकर फाटक यांनी रुग्णांची सेवा केली. सिद्धी फाटक या युवतीने सेंटरमधील रुग्णांच्या तपासणी बरोबरच त्यांना जेवण देणे, दैनंदिन वस्तू पोहोचवण्याची कामे केली. त्याबरोबरच अनेक रुग्णांशी संवादही साधला. रुग्णांसमोर जाताना पीपीई किट घातल्याशिवाय जाता येत नव्हते. तर शुंभकर या युवक गरवारे मधील व्यवस्थापन भागात कार्यरत होता. त्याने रुग्णांना प्रवेश देण्यापासून ते घरी सोडण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सहभाग होता.

मानवी वस्तीतील प्राण्यांची काळजी

लव केअर शेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष पियुष शहा यांनी कुत्रे, मांजरी, गाय अशा मानवी वस्तीतील प्राण्यांची सेवा केली. त्यांनी टीमच्या माध्यमातून संचारबंदीत प्राण्यांना जेवण देण्याबरोबर त्यांच्यावर उपचारही केले. त्यामध्ये २०० कुत्र्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले. तसेच अनेक प्राण्यांची तपासणीही करण्यात आली. काही प्राण्यांना उपचारासाठी दुचाकीवर घेऊन जात होते.

संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा

रोहित धायरकर या युवकाने स्वरूपवर्धिनी संस्थेच्या शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले. मुलांचे व्हाट्स अँप ग्रुप तयार करण्यात आले होते. त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे, व्यायाम, विविध उपक्रम यांचे व्हिडिओ पाठवले. तसेच पूर्व भागातील वस्त्यात जाऊन नागरिकांच्या स्क्रिनिंग बरोबरच, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्या, आयुर्वेदिक काढा, देण्याचे कार्य केले. तसेच लक्षणे दिसणाऱ्या अनेकांची कोविड टेस्टची सोय करून देण्यात आली.

Web Title: Remarkable performance of youth in the Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.