विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर वर्गोंन्नतीचा शेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:43+5:302021-05-10T04:11:43+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गतपहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. विद्यार्थी वर्गात असताना शिक्षकांकडून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गतपहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. विद्यार्थी वर्गात असताना शिक्षकांकडून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांचा निकाल श्रेणी देऊन जाहीर केला जातो. परंतु, पहिली ते चौथीपर्यंत असा एकही वर्ग सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक दरवर्षीप्रमाणे असणार नाही.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मागील वर्षी अधिक होती. त्यामुळे पुणे शहरातील शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या नाही. शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे शासनाने सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
---
प्रगतीपुस्तकच बदलणार
विद्यार्थी शाळेत किती दिवस उपस्थित होता. त्याचे वजन किती, उंची किती व त्याला कोणती श्रेणी मिळाली, असा उल्लेख दरवर्षी प्रगतीपुस्तकावर असतो. परंतु, या यंदा हे सर्व प्रगतीपुस्तकावर असणार नाही. प्रगती पुस्तकाचे स्वरूप यंदा पूर्णपणे बदलणार आहे.
--
राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासन आदेशाप्रमाणे यंदा सर्व विद्यार्थ्यांच्या निकालावर वर्गोंन्नतीचा उल्लेख करण्यात येणार आहे.
- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
---
ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले
मला ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. वर्गात बसून अधिक चांगल्या प्रकारे शिकता येते. शिक्षकांना प्रश्न विचारता येतात. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शंका उपस्थित करता येतात. परंतु, ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक अडचणी येत आहेत.
- सुयश सूर्यवंशी, विद्यार्थी
--
वर्गात बसून मित्रांबरोबर शिकणे अधिक चांगले वाटते. ऑनलाइन वर्ग सुरू असल्यामुळे वाचन लेखन याबाबत मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे.
- स्वामीराज खलीपे, विद्यार्थी
--
ऑनलाइन शिक्षणात ब-याच वेळा तांत्रिक अडचणी येतात. एखादा महत्त्वाचा विषय सुरू असल्यास तो समजून घेणे अडचणीचे होते. त्यामुळे ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने शिक्षण लवकर सुरु व्हावे.
- तन्मय भारमल, विद्यार्थी
--
जिल्ह्यातील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी : ७,६३,३६५
जि. प. शाळेतील विद्यार्थी : १,७७,८६३
मनपा शाळेतील विद्यार्थी : ६४,३७५
सेल्फ फायनान्स शाळेतील विद्यार्थी : ३,३३,६७१
खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थी : ९८,२८९
विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी : ५२,९१३
केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी : ७,५१६