रेमेडेसिविर प्रमाणेच फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लु ही दोन औषधेही कोरोना रुग्णासाठी प्रभावी - डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 PM2021-04-17T16:28:15+5:302021-04-17T16:29:21+5:30

डॉक्टर आणि उपचार घेणारे रुग्ण दोन औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा

Like Remedacivir, Faviparavir and Fabi Flu are also effective for corona patients. Appeal by Amol Kolhe | रेमेडेसिविर प्रमाणेच फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लु ही दोन औषधेही कोरोना रुग्णासाठी प्रभावी - डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आवाहन

रेमेडेसिविर प्रमाणेच फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लु ही दोन औषधेही कोरोना रुग्णासाठी प्रभावी - डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्दे डॉक्टरांनी सध्यातरी गरजू रुग्णांनाच रेमेडेसिविर इंजेक्शन द्यावे

लोणी काळभोर : रेमेडेसिविर इंजेक्शन हे शंभर टक्के जीवनरक्षक नाही. असे कोविड टास्क फोर्सने यापुर्वीच जाहीर केले आहे. रेमेडेसिविर प्रमाणेच फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लु ही दोन औषधे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगले पर्याय आहेत. हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बाधितांचे नातेवाईक व रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर या दोघांनीही घाबरून न जाता या दोन औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा असा आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. 

खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी शनिवार लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. व पूर्व हवेलीतील कोरोना रुग्ण व आरोग्य विभागाला येणा-या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलतांना खासदार कोल्हे यांनी वरील आवाहन केले. यावेळी हवेलीचे अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, लोणी काळभोर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय पवार, कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई, तलाठी दादासाहेब झंजे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते. 

कोल्हे म्हणाले,  रूग्णालयातील डॉक्टर व बाधितांचे नातेवाईक यांच्याकडून रेमेडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणत आहे. ते उपलब्ध होत नसल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत. यामुळे या पुढील काळात वरील इंजेक्शनचा मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाकडुन युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यामुळे डॉक्टरांनी सध्यातरी गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन द्यावे. रेमेडेसिविर जीवनरक्षक नसले तरी याचा उपयोग शरीरातील विषाणूचा भार होण्यासाठी होतो. यामुळे सध्याची मागणी मोठ्या प्रमाणांत वाढली आहे. इंजेक्शन उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध म्हणुन फेव्ही पॅरावीर अथवा फॅबी फ्लु सुचविले आहे. यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रेमेडेसिव्हिर इंजेक्शन वापराबाबत पुर्ण विचार करण्याची गरज आहे. शासनाने रेमेडेसिविर इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी युद्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रेमेडेसिविर चा पुरवठा सुरुळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देण्याची गरज आहे. नागरीकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
                

Web Title: Like Remedacivir, Faviparavir and Fabi Flu are also effective for corona patients. Appeal by Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.