जिल्ह्यात रेमडेसिविर टंचाई नियंत्रण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:00+5:302021-04-12T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. हा काळाबाजार रोखण्यासाठी व पेशंटच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश काढून मेडिकलमधील रेमडेसिविरची विक्री बंद केली. यामुळे रविवारी पेशंटला हाॅस्पिटलमध्ये रेमडेसिविरच इंजेक्शन मिळेना व मेडिकलमधील विक्री बंद केल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यासाठीच रविवार (दि.11) रोजी तातडीने आदेश काढून रेमडेसिविर टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन केले.
यात रेमडेसिविरबाबत काही अडचण, तक्रार असेल तर येथे संपर्क करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी काढले.
याबाबत देशमुख यांनी आपल्या आदेशात कोविड-१९ विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव व वाढत असलेली रुग्णसंख्या विचारात घेता रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी, त्याचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्याची विक्री व वितरण नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडील जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
-------
...असे ठेवणार नियंत्रण
- रेमडेसिविर इंजेक्शन उत्पादक कंपन्यामार्फत स्टॉकिस्ट यांना पुरविणेत आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन साठा याची माहिती संबंधित कंपनी व स्टॉकिस्ट यांनी नियंत्रण कक्षास कळविणे आवश्यक आहे.
- रेमडेसिविर इंजेक्शनची स्टॉकिस्ट यांनी हॉस्पिटलच्या मागणीप्रमाणे इंजेक्शनचे वितरणाबाबत केलेले नियोजन नियंत्रण कक्षास कळविणे आवश्यक आहे.
- हाॅस्पिटलच्या मागणीप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन स्टॉकिस्ट यांचेकडून पुरवठा झाल्याबाबत खात्री करणे,
- सर्व कोविड-१९ रुग्णालय आस्थापना यांनी रेमडेसिविर इंजेक्शन स्टॉकिस्ट यांचेकडून पुरवठा करणेत आलेले इंजेक्शन आवश्यकता असलेल्या रुग्णांना द्यावयाचे आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेस कोविड रुग्णालय व्यवस्थापनास जबाबदार धरणेत येईल.
- सर्व कोविड-१९ रुग्णालय आस्थापना यांनी त्यांच्याकडील रुग्णांची अद्यायावत माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुगल स्पेरडशिटवर अचूक भरणेत यावी. सदर रुग्णसंख्येनुसारच वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी संबंधित कंपनीच्या स्टॉकिस्टकडे करावयाची आहे.
- सर्व रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा करणारे स्टॉकिस्ट यांनी प्रत्येक दिवशी एकाच कंपनीचे रेमडेसिविर इंजेक्शन संबंधित कोविड-१९ रुग्णालयास दयावयाचे आहेत. - रुग्णालयास मोठ्या प्रमाणात पुरवठा न करता सर्व रुग्णालयांची मागणी विचारात घेऊन त्याप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणेत यावा, यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संबधित स्टॉकिस्ट व कोविड-१९ रुग्णालय व्यवस्थापन यांना जबाबदार घरून कायदेशीर कारवाई करणेत येईल.
- सर्व कोविड १९ रुग्णालये व्यवस्थापक यांनी रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक यांचेकडे रेमडेसिविर इंजेक्शनबाबत प्रीस्क्रिप्शन न देता मेडिकल प्रोटोकॉलनुसार स्वत: रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी स्टॉकिस्टकडे करावयाची आहे. अन्न व औषध प्रशासनाने कोविड-१९ रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे स्टॉकिस्ट यांचेकडून पुरवठा सुरळीत होत असलेबाबत खात्री करावी.
- नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनो रेमडेसिविर इंजेक्शनवाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी हॉस्पिटलनिहाय मागणी याबाबत नोंदी ठेवणे.
- नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी रेमडेसिविर इंजेक्शनबाबत करणेत आलेल्या भरारी पथकाकडून माहिती घेणे व सदरची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे यांचेकडे कळविणे.
------
...असा असेल नियंत्रण कक्ष
- वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कॉल करावा.
- शीतल घाटोळ - अन्न व औषध प्रशासन - ९८८१७४६९७७
नीलेश गोहिरे - नागरी संरक्षण दल - ९८८१३६६६२१
- भरत कोंढाळकर - नागरी संरक्षण दल - ९५५२६०४८२०
- प्रवीण पाटील - नीरा देवघर प्रकल्प - ९१५८४८९९०८
----------------------------
वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत कॉल करावा
- रमाकांत कुलकर्णी - अन्न व औषध प्रशासन - ९५४५५१४८६४
- विक्रम पुंडे - कुकडी पाटबंधारे विभाग - ७३८७३०९५८४
- सुहास गायकवाड - नागरी संरक्षण दल - ९३५९५६२२७८
- विवेक कांबळे - सामान्य प्रशासन, जि.प.- ९४२१२१४४६१
----------------------
वेळ रात्री ९.३० ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत कॉल करावा
- नी. ब. खोसे - अन्न व औषध प्रशासन - ९८८११२७७३७
- अनिल गवते - अन्न व औषध प्रशासन - ९०४९९७१३११
- एस. एस. भांडवलकर - उजनी जलविद्युत विभाग- ९७६७७५३४९९
- अमोल सोनवणे - कालवे विभाग, पुणे - ८९९९२२०१५५
- अमर काळे - मार्ग प्रकल्प विभाग- ८८८८२२११११
- पी. पी. खिरे - पाटबंधारे विभाग - ८३७९०२२५९४
---------------------