Remedies for PCOD : पीसीओडीमुळे चेहऱ्यावर लव...काय करू? जाणून घ्या पीसीओडीची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:50 AM2022-05-23T09:50:58+5:302022-05-23T09:57:17+5:30

कमीपणा कशासाठी? बदल स्वीकारायला हवा...

Remedies for PCOD hair on the face due what shoul do to recover pcod and pcos | Remedies for PCOD : पीसीओडीमुळे चेहऱ्यावर लव...काय करू? जाणून घ्या पीसीओडीची लक्षणे

Remedies for PCOD : पीसीओडीमुळे चेहऱ्यावर लव...काय करू? जाणून घ्या पीसीओडीची लक्षणे

googlenewsNext

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : तिचे वय चाळिशीच्या आसपास...मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊ लागली, रक्तस्राव वाढला म्हणून तिने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम अर्थात पीसीओडीचे निदान झाले. आजाराची लक्षणे दिसू लागली. चेहऱ्यावर, मानेवर केस वाढू लागले. कितीही वेळा थ्रेडिंग केले तरी केसांची वाढ परत व्हायची. सौंदर्याची टिपिकल व्याख्या असलेल्या मानसिकतेतून कुटुंबीय, नातेवाईक यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आजारामुळे शारीरिक त्रास तर होत होताच; मानसिक त्रासही होऊ लागला. अखेरीस तिने लेझर ट्रीटमेंटचा पर्याय स्वीकारला. स्त्रीने सुंदरच दिसले पाहिजे, एखाद्या आजारामुळे तिच्यामध्ये काही शारीरिक बदल होत असतील तर तिला आहे तसे सौंदर्याच्या कारणास्तव का होईना, स्वीकारायचे की निराशेच्या गर्तेत डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. ढकलायचे, असा प्रश्न या निमित्ताने चेहऱ्यावर, मानेवर केस वाढण्याची उपस्थित होत आहे.

तरुणी आणि महिलांमध्ये आजकाल पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमची समस्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. पीसीओडीमध्ये अनियमित मासिक पाळी, स्थूलपणा, चेहऱ्यावर पुरुषी प्रकारची लव, केसांची वाढ अशी लक्षणे आढळतात. सौंदर्याच्या कारणास्तव का होईना, डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. चेहऱ्यावर, मानेवर केस वाढण्याची समस्या महिलांना निराशेच्या गर्तेत ढकलते.

हातापायावरचे, पोटावरचे केस लपवता तरी येतात. चेहऱ्यावरील, मानेवरील केस लपवणार तरी कसे, याचा विचारच केला जात नाही. तात्पुरता उपाय म्हणून पार्लरमध्ये जाऊन केस काढून टाकले जातात. मात्र, त्या ठिकाणी नव्याने आणखी जाड आणि राठ केस येऊ लागतात. लेझर ट्रीटमेंट प्रत्येकाला परवडणारी नसते. अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या महिलेला समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा, दृष्टीचा सामना करताना नाकीनऊ येतात. त्यामुळे मुळात तिचे रूप आहे तसे स्वीकारण्याची सुरुवात कुटुंबीयांपासून व्हायला हवी, असे मत जनरल फिजिशियन डॉ. रेखा डोईफोडे यांनी व्यक्त केले.

पीसीओडीची लक्षणे

  1. चेहऱ्यावर डाग
  2. अनावश्यक केस येणे
  3. जाडी वाढणे
  4. हार्मोनल असंतुलन, केस गळणे
  5. मासिक पाळी अनियमित असह्य वेदना होणे, वंध्यत्व
  6. चिडचीड वाढणे, रड येणे रडू
  7. सहनशक्ती कमी होणे

 

स्त्रियांनी हे लक्षात ठेवा :

  • बाह्यसौंदर्य म्हणजे सर्वस्व नाही
  • आत्मविश्वास गमावू नका
  • लोकांकडे दुर्लक्ष करा
  • तुम्ही स्वतःला आहे तसे स्वीकाराल तरच इतर लोक स्वीकारतील
  • सोशल गॅदरिंग टाळू नका

 

पीसीओडी, थायरॉईड, अनुवंशिकता अशा कारणामुळे चेहऱ्यावर केस वाढू लागतात. त्यामुळे महिलांमध्ये नैराश्य येणे, आत्मविश्वास कमी होणे, एकलकोंडेपणा वाढणे असे बदल होतात. अशा वेळी महिला लेझर ट्रीटमेंटचा पर्याय निवडतात. लेझर ट्रीटमेंटमध्ये जाड केसांची मुळे जाळली जातात. दीड-दोन महिन्यांच्या अंतराने अशी आठ-दहा सेशन केली जातात. यामुळे ८० टक्के केस निघून जातात. शरीरावर या उपचारपद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्वचेच्या केवढ्या भागावर ट्रिटमेंट करायची आहे, त्यानुसार पॅकेज ठरलेली असतात. एका सेशनला साधारणपणे १०००-२००० रुपये खर्च येतो.

- डॉ. अवंती पटवर्धन, सौंदर्योपचारतज्ज्ञ

Web Title: Remedies for PCOD hair on the face due what shoul do to recover pcod and pcos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.