मामानेच केले दोन भाच्यांचे लैेंगिक शोषण
By admin | Published: July 7, 2017 02:39 AM2017-07-07T02:39:47+5:302017-07-07T02:39:47+5:30
आई वडिलांच्या भांडणामुळे आजोळी शिक्षणासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सख्ख्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : आई वडिलांच्या भांडणामुळे आजोळी शिक्षणासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सख्ख्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुणवडी
(ता. बारामती) परिसरात घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी संदीप दशरथ शिंदे (वय ३५, रा. गुणवडी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी फलटण तालुक्यातील आहे. तिच्या आई-वडिलांंच्या भांडणामुळे मुलींना घेऊन तिची आई मुलींच्या मामाकडे राहण्यास आली. या वेळी डोर्लेवाडी येथील शाळेत एकीने ७ वी मध्ये, तर ११ वर्षीय बहिणीला ५ वी मध्ये प्रवेश घेतला.
या दरम्यान, मुलीच्या आई वडिलांचा वाद मिटला. त्यामुळे त्या आई-वडिलांबरोबर गावी गेले. मात्र, शिक्षणासाठी अल्पवयीन मुलगी, तिची बहिण भावासमवेत शिक्षणासाठी मामाकडे राहिली. ते सर्वजण शिक्षण घेत होते. १३ मार्च २०१७ रोजी रात्री तीनच्या दरम्यान पूर्वी, नंतर वेळोवेळी आरोपी शिंदे याने अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीवर जबरदस्तीने मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस कॉन्स्टेबल तात्यासाहेब खाडे करीत आहेत.