जिल्ह्यात सर्वाधिक १० हजारांवर रेमडेसिविर मंगळवारी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:29+5:302021-04-28T04:12:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ६१० हाॅस्पिटलला १० हजार ८५ इंजेक्शन्सचे वाटप: तुटवडा कमी होण्याची शक्यता पुणे : गेल्या काही ...

Remedisivir is available on Tuesday at a maximum of 10,000 in the district | जिल्ह्यात सर्वाधिक १० हजारांवर रेमडेसिविर मंगळवारी उपलब्ध

जिल्ह्यात सर्वाधिक १० हजारांवर रेमडेसिविर मंगळवारी उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

६१० हाॅस्पिटलला १० हजार ८५ इंजेक्शन्सचे वाटप: तुटवडा कमी होण्याची शक्यता

पुणे : गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा मंगळवार (दि.२७ ) रोजी पुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला. यामुळे सोमवारी उशिरा आलेले २४८५ रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि मंगळवार (दि. २७) रोजी आलेले ७६०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध झाल्याने तब्बल १० हजार ८५ रेमडेसिविर इंजेक्शन्सचे जिल्ह्यातील ६१० हाॅस्पिटलला ६० टक्क्यांनी वाटप करण्यात आले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे.

पुणे जिल्ह्यात तब्बल ६१० खासगी हाॅस्पिटल्समध्ये सध्या कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात हाॅस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्स व ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस खूपच कमी प्रमाणात पुरवठा होत होता. पण मंगळवारी एकाच दिवशी ७ हजार ६०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध झाली. पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी, देहू कॅन्टोन्मेंट, पुणे जिल्हयातील नगरपालिका, नगर पंचायती व ग्रामीण भागामध्ये समप्रमाणात रेमडेसिविर या औषधाचा पुरवठा होणार आहे.

अन्न व औषध प्रशासनामार्फत दैनदिन स्वरूपात प्राप्त होण्याऱ्या रेमडेसिविर औषध साठ्याबाबतची माहिती प्राप्त करून घेतली जाते. पुणे जिल्ह्यातील एकूण ६१० रुग्णालयांतील एकूण १५ हजार ८९१ फंक्शनल बेड्स (ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड्स) यांना औषधसाठा समप्रमाणाम वाटप केला जातो. यासाठी प्राप्त औषधसाठा व रुग्णालयांतील फंक्शनल बेड या आधारे वाटपाची टक्केवारी / कोटा निश्चत केला जातो. सर्व रुग्णालयांना फंक्शनल बेडच्या संख्येच्या प्रमाणात कोट्यानुसार समप्रमाणात वाटप करण्यात येते.

वितरकामार्फत पुरवठा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष

पुणे जिल्ह्यासाठी तब्बल ७० टक्के रेमडेसिविर हेट्रो कंपनीकडून तर, उर्वरित सुमारे ३० टक्के साठा सिप्ला, सन फार्मा, माटालान रेड्डी, झायडस, ज्युबिलिन्ट यांचेकडून प्राप्त होतो. प्रत्येक कंपनीचे वितरकाचे वितरण क्षेत्र वेगवेगळे असल्याने प्राप्त साठा ज्या कंपनीचा आहे, त्याच वितरकांच्या क्षेत्रात वितरण केले जाते. कंपनीनिहाय प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या इंजेक्शन साठ्यानुसार वितरणाचे एक किंवा दोन टप्पे निश्चित केले जातात. पहिल्या टप्प्यात ठरलेल्या कोट्यानुसार उपलब्ध साठा ज्या कंपनीच्या वितरकांचा आहे, त्याच भागात वाटप होते. दुसऱ्या टप्प्यातील साठा प्राप्त होताच त्याच अथवा दुसऱ्या दिवशी स्वतंत्र आदेशाने उर्वरित रुग्णालयांना निश्चित केलेल्या कोट्यानुसार कंपनीचे वितरक / स्टॉकीस्टमार्फत साठा समप्रमाणात वितरित केला जातो. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयांतील नावे दुबार होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाते.

Web Title: Remedisivir is available on Tuesday at a maximum of 10,000 in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.