याद राख...सरपंच व्हायचा नाद केला तर बघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:34+5:302021-01-23T04:10:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मांडवी बुद्रुक व गोगावले वाडी या गावात दहशत निर्माण करून सरपंचपदी बिनविरोध ...

Remember ... if you want to be Sarpanch, look | याद राख...सरपंच व्हायचा नाद केला तर बघ

याद राख...सरपंच व्हायचा नाद केला तर बघ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मांडवी बुद्रुक व गोगावले वाडी या गावात दहशत निर्माण करून सरपंचपदी बिनविरोध निवडून येत इच्छुकांना सरपंच पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी धमकावल्या प्रकरणी अटक केलेल्या सराईताच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला येत्या १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

तुषार ऊर्फ अप्पा सुभाष गोगावले (वय २८ रा. वडगाव बुद्रूक) या सराईताचे नाव आहे. या प्रकरणात विजय नथू पोळेकर (वय २२), विशाल नारायण कोतवाल (वय २८), ऋषीकेश रमेश पाटील (वय २७) आणि चेतन संजय कांबळे (वय २०) यांनाही अटक झाली आहे. रामा मरगळे, अक्षय सुर्वे, नाना कुदळे, अभिजित सुर्वे, अक्षय दहिभाते, केदार भालशंकर, मयूर वाघमारे, सुरेश यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तमनगर पोलिस ठाण्याचे किरण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. १८) हवेली तालुक्‍यातील मांडवी खुर्द परिसरात ही घटना घडली. फिर्यादींना मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे ७० लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता गोगावले याने मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मदतीने टोळी तयार केली. या टोळीच्या मदतीने मांडवी बुद्रूक व गोगावले वाडी या गावात दहशत निर्माण करून बिनविरोध निवडून आला. त्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर निवडून आलेल्या पॅनलप्रमुखाला सरपंच पदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी शस्त्राच्या धाकाने धमकावले.

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पाच जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी, ही शस्त्र त्यांनी कोठून आणली, रामा मरगळे याने ही शस्त्र पुरवली आहेत का, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का आदी गुन्ह्याच्या तपासासाठी गोगावलेला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.

Web Title: Remember ... if you want to be Sarpanch, look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.