गडकिल्ल्यांद्वारे शिवरायांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:26 PM2018-11-11T23:26:00+5:302018-11-11T23:26:20+5:30
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांतील शिवप्रेमी कुटुंबांतील लहान-मोठ्या मुलांनी दीपावलीनिमित्त मातीचे विविध प्रकारचे किल्ले बनविले आहेत.
चासकमान : खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांतील शिवप्रेमी कुटुंबांतील लहान-मोठ्या मुलांनी दीपावलीनिमित्त मातीचे विविध प्रकारचे किल्ले बनविले आहेत. कमान गावातील विश्वराज संजय नाईकरे याने पालकांच्या मदतीने सिंहगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. वन विभागाच्या कारवाईत ठार झालेल्या अवनी वाघिणीला श्रद्धांजली देणारी चित्रे व फलकदेखील लावले. विश्वराजचा सिंहगड किल्ला पाहण्यासाठी कडधे, ठाकूर पिंपरी, केळगाव (आळंदी), भोसरी, तसेच आंबेगावच्या पठार भागातूनही दुर्गप्रेमींनी हजेरी लावली.
कडधे गावात विद्यार्थ्यांसाठी ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे
आयोजन केले होते. स्पर्धेत तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धकांना येथील युवकांच्यावतीने प्रशस्तिपत्र व रोख स्वरूपात बक्षिसे देणार आहेत.