चांगल्या मूल्यांसाठी महात्म्यांचे पुण्यस्मरण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:28+5:302021-01-18T04:10:28+5:30
नारायणगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, धर्मवीर संभाजी पतसंस्था आणि समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिर येथे आयोजित ...
नारायणगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, धर्मवीर संभाजी पतसंस्था आणि समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डेरे आणि समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, युवा नेते अमित बेनके, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज माजी अध्यक्ष किरण मांजरे, जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन पडवळ, उपसरपंच सारिका डेरे, माजी उपसरपंच संतोष दांगट, धर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, राम दळवी, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले डॉ.अरुणा वाघोले, राखी रत्नपारखी, आशिष माळवदकर, सूरज वाजगे , हर्षल मुथा, गणेश वाजगे, तेजस रोकडे, राजेश रत्नपारखी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या राज्य पुरस्कार नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षल मुथा यांना राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार आणि प्राध्यापिका डॉ. अरुणा वाघोले यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल आणि तेजस रोकडे यांच्या विशेष सहकार्याबद्दल यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रास्ताविक समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे यांनी केले व सूत्रसंचालन माजी उपसरपंच आशिष माळवदकर व मेहबूब काझी यांनी केले.
फोटो : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हर्षल मुथा यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करताना जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे.