‘स्वातंत्र्यवीरांमधील भेदभाव दूर करावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:47 AM2018-05-29T05:47:37+5:302018-05-29T05:47:37+5:30
अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ब्रिटिशांनी अनेक स्वातंत्र्यवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत भेदभाव करण्यात येत आहे.
पुणे : अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ब्रिटिशांनी अनेक स्वातंत्र्यवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत भेदभाव करण्यात येत आहे. वीर सावरकारांप्रमाणे त्या १४९ स्वातंत्र्यवीरांनाही समान सन्मान द्यावा व त्यांची छायाचित्रे संसदेतील दालनात लावावीत, अशी मागणी अॅड. असीम सरोदे यांच्या सोबत वैष्णव इंगोले, राकेश माळी, प्राजक्ता झलके, काजल मांडगे, दीपक चटप यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. सावरकर यांचेच छायाचित्र संसदेत लावण्यात आले आहे. इतर स्वातंत्रवीरांचे छायाचित्र का लावण्यात येत नाही व त्यांच्यासोबत त्यांच्या मृत्यूनंतरही का भेदभाव होतो, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे़