‘प्रार्थनास्थळावरील ध्वनिक्षेपक हटवा’
By admin | Published: May 18, 2016 01:57 AM2016-05-18T01:57:00+5:302016-05-18T01:57:00+5:30
परिसरातील प्रार्थनास्थळावर भोंगे बसविण्यात आले आहेत. त्यावरील आवाजामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे.
खडकी : परिसरातील प्रार्थनास्थळावर भोंगे बसविण्यात आले आहेत. त्यावरील आवाजामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. संबंधित प्रार्थनास्थळावर कारवाई करून कर्कश्श आवाज करणारे स्पीकर आणि कर्णे जप्त करण्याची मागणी येथील विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रार्थनास्थळावर कर्कश्श आवाज पसरविणारे ध्वनिक्षेपक बसविण्यास बंदी घातली आहे. असे ध्वनिक्षेपक त्वरित काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे असतानाही विविध प्रार्थनास्थळांवर कर्कश्श आवाज करणारे ध्वनिक्षेपक कायम आहेत. परिसरात रुग्णालय, अनेक शाळा, मैदान, तसेच नागरी वस्ती आहे. प्रार्थनास्थळाच्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांसह रुग्ण, विद्यार्थी, खेळाडूंना त्रास होत आहे. अशी तक्रार शिवसेना, वंदे मातरम् संघटना, युवा सेना, वीर सावरकर प्रतिष्ठान, संभाजी प्रतिष्ठान, खडकी कृती समितीने केली आहे. (वार्ताहर)