वनपरिक्षेत्रात जाळपट्टे काढून अज्ञात व्यक्ती कडून वणवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:02+5:302021-02-25T04:11:02+5:30
भोर तालुक्यात सह्याद्रीच्या रांगा मोठ्या आहेत. त्यामध्ये वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या वतीने जंगल संपत्तीची रास होऊ नये पशुपक्ष्यांची ...
भोर तालुक्यात सह्याद्रीच्या रांगा मोठ्या आहेत. त्यामध्ये वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या वतीने जंगल संपत्तीची रास होऊ नये पशुपक्ष्यांची जीवित हानी होऊ नये या करिता वनविभागाच्यावतीने वनपरिक्षेत्रात जाळ पट्टे काढले जातात, हे जाळपट्टे काढताना जंगलाची हानी होणार नाही, याची काळजी करतात. परंतु कोणी अज्ञात व्यक्ती विनाकारण वणवे लावतात. वणवे लावल्यामुळे वनपरिक्षेत्रातील व डोंगररांगेतील गवत, झाडे, झुडपे, नवीन तयार झालेली रोपे या वनव्यातून जळून जातात. शिंदे, गवडी कीवत, बसरापूर, बारे, वेळवंड, पसुरे, म्हाळवडी येथील अज्ञात व्यक्ती वणवे लावतात वणवे लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. सापडल्यास त्या व्यक्तीवर वन अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई करू, असे वनपाल एस. आर. खाट्टे, शिवकुमार होनराव यांनी सांगितले आहे.
वनपरिक्षेत्राच्या लगतच्या गावामध्ये वनकमिटी स्थापन केलेल्या आहेत. वणवे लावू नये म्हणून जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा वणवे लावले जातात. वणवे लावणाराचे नाव समजले तर त्याच्यावर योग्य ती कारवार्इ करण्यात येईल, असे वनपाल पांडुरंग गुट्टे यांनी सांगितले.
स्वप्निलकुमार पैलवान