सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून शनिवारवाडा हटवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:22 PM2019-01-03T12:22:04+5:302019-01-03T12:42:28+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील 'शनिवारवाडा' काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे.

remove Shaniwarwada's image from the Savitribai Phule Pune University logo | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून शनिवारवाडा हटवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून शनिवारवाडा हटवा

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मागणी करण्यात आली.विद्यापीठाचे 1950साली कमळात शनिवारवाडा असे बोधचिन्ह तयार करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे फुले यांच्या नावाने नामांतर करण्यात आले आहे. मात्र अजूनही जुने बोधचिन्ह बदलण्यात आलेले नाही.

पुणे - सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील 'शनिवारवाडा' काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, 1948साली तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे 1950साली कमळात शनिवारवाडा असे बोधचिन्ह तयार करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे फुले यांच्या नावाने नामांतर करण्यात आले आहे. मात्र अजूनही जुने बोधचिन्ह बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे बोधचिन्हात तात्काळ बदल करावा व फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावा अशी मागणी या संस्थांनी केली आहे.

सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे सचिन माळी म्हणाले की, मुलींना शिक्षणाची दारे खुले करणाऱ्या सावित्रीमाईंचे नाव विद्यापीठाला देणे योग्य आहेच मात्र बोधचिन्ह (लोगो) त्यांची प्रतिमाही वापरायला हवी. ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्याप्रमाणे पुण्यातही फुले यांची प्रतिमा वापरावी. आता या मागणीवर विद्यापीठ प्रशासन बोधचिन्ह बदलणार की नव्या वादाला तोंड फुटणार याचे उत्तर काही दिवसात मिळेल.

Web Title: remove Shaniwarwada's image from the Savitribai Phule Pune University logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.