Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:47 IST2025-04-11T16:45:53+5:302025-04-11T16:47:08+5:30

ब्रिटिशांनी महाराजांच्या समाधीसाठी दिलेले पैसे कुत्र्याच्या समाधीसाठीही वापरण्यात आले

Remove the tiger's tomb from Raigad; Udayanraje's demand | Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी

Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी

पुणे : पुण्यात महात्मा फुले वाडा येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त खासदार छत्रपती उदयनराजे भोसले फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे.  

उदयनराजे म्हणाले, रायगडावर आपण गेल्यावर तुम्हाला वाघ्या कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा? समोर येते. इंदोरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील. त्यानंतरचे शिंदे असतील. नागपूरचे भोसले असतील ही सगळी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती. कालांतराने काय झालं? भाग वेगळा आहे. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ब्रिटिशांना त्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की, तुम्ही ज्यांच्यासाठी का काम करताय? आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य आहे का? हे ब्रिटिश होते कोण? आपल्याला सांगणारे हा देश आपला आहे.

त्यांनी त्यांना सांगितलं. ते एवढं महाधिन झालंय. की महाराजांच्याबद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले. पैसे हे महाराजांच्या समाधीसाठी दिले होते. तेच कुत्र्यासाठी वापरण्यात आले. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतात बघितलंय का? ही ब्रिटिश कुत्री आहेत. अहो काढून टाका ती समाधी कशाला पाहिजे ती रायगडावर असा सवाल राजेंनी यावेळी उपस्थित केला.  नको त्या कुत्र्याचं जास्त कौतुक करायला. त्या जास्त विचार करायचा? काढून टाका ती समाधी. 

वाघ्या कुत्र्याचे इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने त्याची समाधी रायगडावरून कायमस्वरुपी हटवण्यात यावी. अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना एक पत्राद्वारे केली होती. तसंच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोध करणाऱ्यांना उत्तरही दिलं. अशाच प्रकारे मागणी करणारं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लिहिलं होतं. त्यानंतर सर्वत्र गदारोळ सुरु झाला आहे. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध केला. गरज पडली तर यासाठी तीव्र आंदोलन करू, न्यायालयात जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे. आता छत्रपतींचे वंशज उदयनराजे यांनीसुद्धा वाघ्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे.  

Web Title: Remove the tiger's tomb from Raigad; Udayanraje's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.