सोलापूर महामार्गावरील धोकादायक माती काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:22+5:302021-09-15T04:15:22+5:30
वाकवस्ती येथील दत्त मंदिर परिसरात महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने दुचाकी घसरून बरेच अपघात घडत होते. गेल्या काही ...
वाकवस्ती येथील दत्त मंदिर परिसरात महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने दुचाकी घसरून बरेच अपघात घडत होते. गेल्या काही काळापासून या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार मातीमुळे घसरून मृत्यू झालेल्या अनेक घटना आहेत. या महामार्गाची जबाबदारी पूर्णपणे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) विभागाची असून, नागरिकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील हा विभाग पुणे सोलापूर महामार्गाकडे दुर्लक्ष करीत आहे.यामुळे नागरिकांना ही जबाबदारी पूर्ण करावी लागत आहे.
या कामासाठी लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, पोलीस नाईक आनंद साळुंखे, महेश मडके, समीर काकडे, शिंदे, पवार यांची मोलाचे सहकार्य लाभले. तर मनसे सहकार सेनेचे हवेली तालुकाध्यक्ष अनुल सुरेश कुंजीर, हवेली तालुका उपाध्यक्ष विश्वजित काळभोर, हवेली तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना सनी फलटणकर, दीपक मराठे, विजय ढोपरे, अतुल काळभोर यांनी याकामी मदत केलेल्या स्थानिक नागरिकांचे आभार मांडले.