कन्हेरीत तीन एकरांवरील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:12+5:302021-06-19T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : कन्हेरी (ता. बारामती) येथील वनपरिक्षेत्रातील अतिक्रमणावर धडक कारवाई करत तीन एकरांवरील अतिक्रमणे वन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : कन्हेरी (ता. बारामती) येथील वनपरिक्षेत्रातील अतिक्रमणावर धडक कारवाई करत तीन एकरांवरील अतिक्रमणे वन विभागाने शुक्रवारी (दि. १८) हटवल्याची माहिती तालुक्याचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी याबाबत माहिती दिली.
बारामती तालक्यातील मौजे कन्हेरी वनक्षेत्रात राखीव वन सर्व्हे नंबर ४३ त्याचा बदललेला सर्व्हे नंबर ६३ त्याचा सध्याचा गट नंबर २९३ मध्ये राखीव वनक्षेत्रापैकी क्षेत्र ५ एकर एवढे भगवान देवबा क्षीरसागर (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि मारुती विष्णू भिसे या आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने व सहकार्याने गुन्हा केला. तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त यांचे अवैधरीत्या आदेशान्वये भारतीय वन अधिनियम १९२७ व वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा भंग करून वन गुन्हा केला. प्रकरणी पुढील कार्यवाही चालू आहे. वन आरोपींचा तपास चालू आहे.
दत्तात्रय निवृत्ती पाटोळे (रा. काटेवाडी, ता. बारामती) वनगुन्हा दाखल केलेवरून कन्हेरी राखीव वन सर्व्हे नंबर ६४ सध्याचा गट नंबर २८९ या राखीव वनक्षेत्रावर वरील आरोपीने ०.३२ हेक्टर आर अतिक्रमण निष्कासित केले.
किशोर हंसराज पाचंगे व दत्तात्रय निवृत्ती पाटोळे यांनी फॉगट नंबर २८९ सर्व्हे नंबर ६४ मधील ४३ गुंठे शेतीचे अतिक्रमण हटविले. भगवान देवबा क्षिरसागर यांनी राखीव वन सर्व्हे नंबर ६४ त्याचा सध्याचा गट नंबर ०.२३ हे. अतिक्रमण काढले. तसेच वन सर्व्हे नंबर ६३ मध्ये १६ गंठे अतिक्रमण केलेले क्षेत्र अतिक्रमण काढून ताब्यात घेतले.
या कारवाईत बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, मोरगावचे वनपाल अमोल पाचपुते, करंजेचे वनपाल प्रकाश चौधरी, बारामतीच्या वनरक्षक मीनाक्षी गुरव, शिर्सुफळचे वनरक्षक अनिल माने, पिंपळीच्या वनरक्षक संध्या कांबळे यांच्यासह दौंड व इंदापूर वनपरिक्षेत्रातील ५० वन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष शासकीय अभियोक्ता अभिजित साकुरकर यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.
फोटो ओळी : कन्हेरी (ता. बारामती) परिसरातील वनपरिक्षेत्रामधील तीन एकरांवरील अतिक्रमणावर वनविभागाने धडक कारवाई केली.
१८०६२०२१-बारामती-१३
१८०६२०२१-बारामती-१५