फलक काढला, पण गैरकारभारचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:53+5:302021-05-20T04:10:53+5:30
कालच्या बातमीनंतर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या त्यातून अनेक प्रश्न व उत्तराला तोंड फुटले आहे. रुग्णालयाने आहारतज्ज्ञाची नेमाणूक केलेली का? ...
कालच्या बातमीनंतर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या त्यातून अनेक प्रश्न व उत्तराला तोंड फुटले आहे.
रुग्णालयाने आहारतज्ज्ञाची नेमाणूक केलेली का?
येथे उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांनी येथील अन्नाच्या गुणवत्तेबादल अनेकदा हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. तसेच, तसच यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाणही मोठे होते, उपचार घेत असलेले अधिकतर रुग्ण हे आपापल्या घरातून जेवण घेणे पसंद करतात. तर एवढे मोठे जेवणाचा बिल कसा काय ठेकेदार देऊ शकतो. अन्न बनवणे आणि वाटप करणे यावर कोणाचेच नियंत्रण नाही. ठेकेदाराने रुग्णालायची जागा, वीज वापरली याकडे कानाडोळा केला जात आहे.
या सगळ्या सरकारी सुविधा ठेकेदार राजरोसपणे वापरत उलट बोर्डाकडूनच पैसे वसूल करतो याबद्दल येथील निवासी वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी यांची पाठराखण आहे का?
कालच्या बातमीनंतर येथील स्थानिक नागरिक, कार्यकर्ते महिला मंडळे, बचत गट यांच्या मते जर टेंडरच काढायचे नव्हते तर रुग्णांना अन्न पुरवठा करण्याचे काम आम्हा स्थानिक महिलांच्या बचत गटांना दिले पाहिजे. आम्ही यापेक्षा चांगल्या जेवण देऊ असे मत व्यक्त केले.
या प्रेरणा सेवा संस्था बाबत धर्मादाय आयुक्त आणि स्थानिक बोर्ड प्रशासन हे दोघेही गप्प कसे काय?
कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना निधीचा वापर काटेकोरपणे का झाला नाही?
रुग्णालयात होत असलेल्या अनेक गैरकारभारांबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती गेल्या २ वर्षांपासून मागितली असून ती आजपर्यंत त्यांना मिळाली नाही, यावरून हॉस्पिटल प्रशासन येथील नागरिकांबद्दल आणि घडणाऱ्या गैरकारभारावर किती गंभीर आहे हे दिसून येते.