भोर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या तीन शाखांचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:35+5:302021-03-18T04:11:35+5:30
जिल्हा बँकेचा विस्तार हा दुर्गम डोंगरी भागातील तळागाळातील नागरिकांसाठी असून तुम्ही मालक तर आम्ही चालक आहोत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ...
जिल्हा बँकेचा विस्तार हा दुर्गम डोंगरी भागातील तळागाळातील नागरिकांसाठी असून तुम्ही मालक तर आम्ही चालक आहोत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केले.
भोर तालुक्यातील कापूरव्होळ, किकवी, आपटी येथील शाखाचे नूतनीकरण बुधवारी (दि. १७) अध्यक्ष रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड, जि. प. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, मानसिंग धुमाळ, सुदाम पवार, जानबा पारठे, सत्यवान आवाळे, मुकुंद थोपटे, बाळासाहेब चव्हाण, विनोद काकडे, रेश्मा पारठे, संतोष पारठे, रघुनाथ पारठे, जगन्नाथ पारठे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सचिव सभासद शेतकरी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की ३६ वर्षांपासून मी बँकेची सेवा करत आहे. १९८४ साली १०२ कोटींची आर्थिक उलाढाल होती. ती आता ११ हजार कोटीवर पोचली आहे. २००९ साली कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी दिली होती. त्या वेळी ७२ हजार कोटीचे कर्ज शेतकऱ्याचे माफ केले होते. कोविड १९ साठी शासनाचे १ लाख ५६ हजार कोटी खर्च झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देणे बाकी आहे. राज्य शासनाकडे निधी उपलब्ध झाला की लगेच अनुदान दिले जाईल.
प्रास्ताविक भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण पारठे, तर आभार आपटी सेवा सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ पारठे यांनी मानले.
--
फोटो क्रमांक : १७ भोर जिल्हा बॅंकेच्या तीन शाखांचे नुतनीकरण
आपटी ( ता. भोर ) येथील जिल्हा बँकेचे नुतनीकरण करताना अध्यक्ष रमेश थोरात