नारायणगाव बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांनंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:15+5:302021-08-20T04:14:15+5:30

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नारायणगाव बस आगारातील नूतनीकरणाचे बांधकाम २०१९ सालापासून बंद असून बांधकामाच्या सभोवताली पत्रे लावलेले ...

Renovation work of Narayangaon bus stand is closed even after two years | नारायणगाव बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांनंतरही बंदच

नारायणगाव बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांनंतरही बंदच

Next

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नारायणगाव बस आगारातील नूतनीकरणाचे बांधकाम २०१९ सालापासून बंद असून बांधकामाच्या सभोवताली पत्रे लावलेले आहेत. त्यावर बसप्रवासी लघुशंका करीत असल्याने स्थानिक रहिवाशी तसेच प्रवासी यांना दुर्गंधीमुळे व अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरिया, टायफाईड असे अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. रखडलेले काम त्वरित चालू करणे व त्या सभोवताली बांधकामासाठी लावलेले पत्रे काढणे खूप गरजेचे आहे. या स्थानकात अशा अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने शौचालयातील अस्वच्छता, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, कचराकुंडी नाही, पावसाळ्यात पाणी साठल्यानंतर खड्डे दुरुस्ती करून मुरूमीकरण केले जात नाही, कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांनी बस गाडीबद्दल विचारणा केल्यानंतर गाडीचे वेळापत्रक व्यवस्थित उत्तर न देता अरेरावीची भाषा वापरली जाते असे अनेक प्रकारचे प्रश्न असून यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या ८ दिवसांत करण्यात येईल, असा इशारा पाटे यांनी दिला आहे.

१९ नारायणगाव

आगारप्रमुखांना मागण्यांचे निवेदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे व इतर.

190821\img-20210819-wa0273__01.jpg

नारायणगाव एस टी स्टॅन्डचे रखडलेल्या इमारतीचे नुतनीकरण सुरु करावे या आशया सह अनेक समस्यांचे निवेदन नारायणगाव आगारप्रमुख यांना देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे .

Web Title: Renovation work of Narayangaon bus stand is closed even after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.