दुर्गाडी येथील वाहून गेलेल्या मोरीची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:34+5:302021-08-12T04:14:34+5:30
ओढ्यात तातपुरत्या मोऱ्या टाकून शिरगाव मार्गे दुर्गाडीकडे जाणार रस्ता सुरू झाला आहे. मात्र कुडली बु. गावाजवळ रस्ता खचल्याने दोन्ही ...
ओढ्यात तातपुरत्या मोऱ्या टाकून शिरगाव मार्गे दुर्गाडीकडे जाणार रस्ता सुरू झाला आहे. मात्र कुडली बु. गावाजवळ रस्ता खचल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद आहे, यामुळे गावाचा संपर्क तुटलेलाचा आहे.
भोर पडत असलेल्या मुसळधार पावसाने भोर-महाड रस्त्यावर पडलेल्या दरडी मागील १५ दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच-सहा जेसीपीच्या मदतीने रस्त्यावरील दरडी काढण्याचे काम सुरू होते. भोर- महाड रस्त्यावर असलेल्या दरडी काढून रस्ता वाहतुकीस तात्पुरता खुला केला आहे.रस्त्यावर असलेल्या दरडी तात्पुरत्या बाजूला केल्या आहेत. दगड, माती गटारातच पडले
आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक आहे.
दरम्यान, रिंगरोडवरील पऱ्हर गावाजवळ पडलेल्या दरडी काढल्या आहेत, त्यामुळे शिरवली हि.मा पर्यंत गाडीची वाहतूक सुरू आहे. मात्र, शिरवली हि.मा व कुडली बु. रस्त्यावर दरडी असून कुडली बु. ते दुर्गाडी रस्त्यावर दरडी पडल्या असून सुमारे १०० मीटर रस्ता खचला आहे. यामुळे कुडली बु. गावातील लोकांचा दोन्ही बाजूकडील संर्पक तुटलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नागारिकांचा सर्पक तुटलेला आहे. त्यामुळे त्वरित रस्ता सुरळीत करण्याची मागणी कुडली बु. येथील नागरिकांनी केली आहे.
दुर्गाडीवरून रिंगरोडने शिरगावला येणाऱ्या मार्गावरील ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे शिरगावमार्गे दुर्गाडी गावाला जाणारी वाहतूक बंद होती.मात्र पुलाच्या ठिकाणी तात्पुरत्या मोऱ्या टाकून भराव करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता तयार केला आहे, यामुळे रिंगरोडवरील शिरगावमार्गे दुर्गाडी गावापर्यंत तातपुरती वाहतूक सुरु झाली आहे.यामुळे दुर्गाडी,अभेपुरी मानटवस्ती या गावांची रस्त्याची सुविधा झाली आहे.माञ रिंगरोडवरील कुडलीबुदुक गावाच्या दोन्ही बाजुला रस्ता खचल्याने वाहातुक बंद आहे.
रिगरोडवरील दुर्गाडी शिरगाव सिमेवर ओढयावर मो-या टाकुन भराव करुन तातपुरता रस्ता सुरु केला आहे