कऱ्हेवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:34+5:302021-02-08T04:10:34+5:30
यावेळी जि. प. सदस्य दत्ता झुरंगे म्हणाले, बंधाऱ्यांचे नुकसान झाल्याने पाणी अडत नाही. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची अडचण ...
यावेळी जि. प. सदस्य दत्ता झुरंगे म्हणाले, बंधाऱ्यांचे नुकसान झाल्याने पाणी अडत नाही. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची अडचण होत आहे. ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे काँक्रिटचे काम होण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना भरपाई देण्यात यावी. तसेच दशक्रिया विधी घाट, स्मशानभूमी नुकसान झाले. त्यालाही जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात यावा, अशी मागणी झुरंगे यांनी सुळे यांना केली. यावेळी सुळे म्हणाल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून वाढीव निधीबाबत मागणी करू. तसेच रेल्वेबाबतच्या मागणी बद्द्ल मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.
सुळे म्हणाल्या, या परीसरात कोरोना नंतर विकासकामांना गती मिळाल्याचे दिसते. केंद्र सरकारने खासदारांचा १२ कोटी निधी कमी केला आहे. मात्र, राज्य सरकारने एकाही आमदाराचा निधी कमी केला नाही असे त्या म्हणाल्या. सध्या मास्क वापरण्याचे प्रमाण कमी दिसत असून लोकांनी कोरोना साथ संपल्याच्या गैरसमजात राहू नये. मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहुरकर, माणिक झेंडे, शिवाजी पोमण, प्रकाश कड, पं स सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, मार्केट कमिटीच्या वंदना गरूड, गणेश जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, दत्तात्रय कसबे, दीपक सुतार, तसेच मामा गरूड, संभाजी गरूड, प्रताप गरूड, संदीप जगताप, रणधीर जगताप, महेश इंगळे, शैलेश खैरे, महेंद्र इंगळे, अतुल गरूड यांसह बेलसर व परिसरातील शेतकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : बेलसर येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांच्या दुरुस्तीच्या कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी खा. सुप्रिया सुळे व मान्यवर.
बेलसर येथे कोल्हापूर पद्धतीच्या नुकसानग्रस्त बंधा-यांची पाहणी करताना सुळे