दुबार मतदारांना निवडणूक आयोगाचा लगाम

By admin | Published: January 13, 2017 03:05 AM2017-01-13T03:05:14+5:302017-01-13T03:05:14+5:30

महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य

Repeat of the Election Commission of Duboors | दुबार मतदारांना निवडणूक आयोगाचा लगाम

दुबार मतदारांना निवडणूक आयोगाचा लगाम

Next

पुणे : महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य निवडणूक आयोगाने चांगलाच लगाम घातला आहे. या वेळी प्रथमच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी एकाच
दिवशी २३ फेबु्रवारी रोजी मतदान होणार असल्याने या दुबार मतदारांना जिल्हा परिषद अथवा महापालिका एकाच ठिकाणी मतदान करता येईल.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातही मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. यातील अनेक मतदारांची नावे राजकीय सोयीसाठी दोन्ही ठिकाणी नोंदविण्यात आली आहेत. शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे निवडणूक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील दुबार नावे मोठ्या प्रमाणात कोथरूड, सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज परिसरात आहेत. पुरंदर आणि दौंडमधील नावांचा समावेश हडपसर आणि कोंढवा परिसरात आहेत. वडगावशेरी, खराडी, चंदननगरमध्ये मोठ्या प्रमाणात शिरूर आणि हवेली तालुक्यंतील मतदारांची
दुबार नावे आहेत. जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांतील मतदार भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात आढळून येतात.
निवडणूक कार्यालयाच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यात तब्बल साडेसहा लाख मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने ही नावे कायम आहेत. (प्रतिनिधी)

 जिल्ह्यात आतापर्यंत नेहमी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या तारखांमध्ये किमान १० ते १५ दिवसांचे अंतर होते. त्यामुळे दुबार नाव असणारे अनेक मतदार नेहमीच दोन्ही ठिकाणी मतदान करीत असल्याचा अनुभव आहे. परंतु, दुबार मतदारांच्या दोन्ही ठिकाणी मतदान करण्याला निवडणूक आयोगाने चांगला लगाम लावला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही जणांकडून यासाठी विशेष ‘तयारी’ केली जाते, अशा तक्रारीही झाल्या होत्या. खास रेशनकार्ड आणि ओळखीचे पुरावे बनवून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदारांकडून मतदान करून घेतले जायचे.

Web Title: Repeat of the Election Commission of Duboors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.