डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

By admin | Published: April 12, 2015 12:27 AM2015-04-12T00:27:28+5:302015-04-12T00:27:28+5:30

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Replacing the defective dePola again | डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

Next

पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून सध्या टाकल्या जात असलेल्या कचऱ्याच्या ढिगालाच ही आग लागली. त्यामुळे दोन दिवसांपासून तब्बल दीड हजार टन कचरा शहरातच साठवून ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
आगीमुळे उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा गाड्या डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहरात दररोज किमान पंधराशे ते सोळाशे टन मिश्र कचरा तयार होतो. पालिकेने केलेल्या विनंतीनुसार, या कचऱ्यातील केवळ ५०० टन सुका कचरा डेपोवर टाकला जातो. तर उर्वरित कचरा शेतकऱ्यांना देऊन काही कचरा शहरातच जिरवला जातो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या काही प्रमाणात सुटली असतानाच गुरुवारी या कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग आणखी भडकली आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडून ज्या ठिकाणी ५०० टन सुका कचरा कँपिंगसाठी घेतला जात होता, त्याच ठिकाणी आग लागल्याने ती आटोक्यात येईपर्यंत एकही गाडी डेपोवर पाठविणे पालिकेस शक्य नाही. त्यामुळे गुरुवारपासून एकही गाडी पालिकेकडून डेपोवर पाठविली नसल्याने सुक्या कचऱ्याची समस्या शहरात निर्माण झाली आहे.

ग्रामस्थ आक्रमक
४आगीमुळे कचरा डेपोच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिक आक्रमक झाले आहेत. यापुढे डेपोवर एकही गाडी येऊ देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली आहे. आग आटोक्यात आल्यानंतरही ग्रामस्थांनी ही आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

४कचरा डेपोवरील आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेची अग्निशमन यंत्रणा तीन दिवसांपासून २४ तास कार्यरत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकत आहे. त्यातच काही दिवसांपासून शहरासह उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. या परिसरात जोराचा पाऊस झाल्यास आगीवर नियंत्रण मिळण्यास प्रशासनास मदत होणार आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे डेपोवर गाड्या पाठविणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कचरा शहरातच पडून आहे.
- सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख

Web Title: Replacing the defective dePola again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.