‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे प्रत्युत्तर

By admin | Published: November 24, 2015 01:05 AM2015-11-24T01:05:08+5:302015-11-24T01:05:08+5:30

‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया’मध्ये (इफ्फी) विद्यार्थी विभागातील चित्रपटांचे स्किनिंग रद्द केल्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी

Reply to FTII students | ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे प्रत्युत्तर

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे प्रत्युत्तर

Next

पुणे : ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया’मध्ये (इफ्फी) विद्यार्थी विभागातील चित्रपटांचे स्किनिंग रद्द केल्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रपट प्रदर्शनासाठी ‘फ्रीडम फिल्म फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवार व बुधवारी सेंटर आॅफ सोशल जस्टिस पिस इन्स्टिट्यूट पियाडेड, दूरदर्शन मार्ग, पणजी येथे हा महोत्सव आयोजित करून त्यांनी सरकारला एक प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे.
‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांसह इतर चार जणांची नियुक्ती केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवस छेडलेल्या आंदोलनाचा बदला म्हणून शासनाने यंदाच्या इफ्फीमध्ये विद्यार्थी विभागच रद्द केला.
महोत्सवादरम्यान ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना अटकावही केला जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांना अटक देखील करण्यात आली होती. या शासनाच्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन व माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा भाग म्हणून पणजी येथे ‘फ्रीडम फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. यामध्ये सध्याच्या विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांनी आपले पुरस्कार सरकारला परत केले आहेत, अशांचेही चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
महोत्सवाच्या सुरुवातीलाच ‘एफटीआयआय स्ट्राइक’ व त्यादरम्यानची गाणी व छोटे व्हिडिओही दाखवण्यात येणार आहे. तसेच करुणा बनसोडे दिग्दर्शित ‘उन्हाची अंगाई’, प्रतीक वत्स दिग्दर्शित ‘कल १५ आॅगस्ट दुकान बंद रहेगी’ अमन वधन दिग्दर्शित ‘प्रभातफेरी’, आदेश केळूसकर दिग्दर्शित ‘तद्पश्चात’ तुषार मोरे दिग्दर्शित ‘सदाबहार ब्रास बँड’ आदी चित्रपट या वेळी दाखवण्यात येणार आहेत.

Web Title: Reply to FTII students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.