निवडणूक विभागाला पाठविणार अहवाल
By Admin | Published: July 8, 2016 03:57 AM2016-07-08T03:57:16+5:302016-07-08T03:57:16+5:30
महापालिका निवडणुकीसाठी किती केंद्र असावीत, मतदानाला किती वेळ लागू शकतो, याबाबतच्या माहितीचा अहवाल महापालिकेकडून राज्य निवडणूक
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी किती केंद्र असावीत, मतदानाला किती वेळ लागू शकतो, याबाबतच्या माहितीचा अहवाल महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला आज (शुक्रवार) पाठविण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठीची राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. दरम्यान, एका यंत्रामध्ये एका मतदाराला मतदान करण्यास किती वेळ लागतो, किती केंद्र असावीत, याबाबतचा अहवाल महापालिकेने ८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गेल्या दोन दिवसांपासून आयोगाच्या सूचनेनुसार कामकाज सुरू होते. महापालिकेकडून सविस्तर ड्राफ्ट तयार करण्यात आला.(प्रतिनिधी)
- एका यंत्रात किती मतदान होऊ शकते, एका तासाला किती जण मतदान करू शकतात, मतदान केंद्रासाठी किती इमारतींची आवश्यकता भासू शकते, किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, याबाबतचा अहवाल तयार करून आज निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त यशवंत माने यांनी दिली.