नोंदणी कायद्यांचा भंग करून दस्त नोंदवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:33+5:302021-08-12T04:15:33+5:30
पुणे : हवेली क्रमांक २७ निबंधक अजितकुमार फडतरे यांनी नोंदणी कायद्याचा भंग करून बेकायदा दस्त नोंदणी केली आहे. ...
पुणे : हवेली क्रमांक २७ निबंधक अजितकुमार फडतरे यांनी नोंदणी कायद्याचा भंग करून बेकायदा दस्त नोंदणी केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तीन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, त्याबाबत अद्याप काेणतीही कारवाई केली नसल्याने नोंदणी महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
७ मार्च २०२१, तसेच ९ एप्रिल २०२१ रोजी हवेली क्रमांक २७ निबंधक अजितकुमार फडतरे यांनी नोंदणी कायद्याचा भंग करून ९८०७/२०२० हा दस्त नोंदवला आहे. हवेली क्रमांक २७ या कार्यालयातील गैरकारभाराबाबत वेळोवेळी महसूल, राज्य शासन, नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी उप महानिरीक्षक यांना तक्रार अर्ज दिले आहेत. मात्र, अद्याप दखल घेतली गेलेली नाही. नोंदणी महानिरीक्षक व नोंदणी उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणी गांभीर्यपूर्वक व जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे. नोंदणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तीवर अंकुश ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे. जेणेकरून पुन्हा अशा गैरकारभार करणाऱ्या प्रवृत्ती डोके वर काढणार नाहीत.
पुणे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर व नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांना निवेदन दिले आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणाची दिरंगाई न करता १५ ऑगस्टपूर्वी दोषींवर योग्य ती कारवाई न झाल्यास नोंदणी महानिरीक्षक व नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयास समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
-----
कोट
नोंदणी कायद्याचा भंग करून बेकायदा दस्त नोंदणी केल्याची आमच्याकडे तक्रार आली आहे. या प्रकरणांवर चौकशी समिती नेमली आहे. आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत. चौकशीत दोषी आढळल्यावर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक, पुणे