पुरंदर तालुक्यातील १८९ व्यक्तींचे अहवाल बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:28+5:302021-04-14T04:10:28+5:30
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या शासकीय लॅबमध्ये ४०० व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी १५९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. ...
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या शासकीय लॅबमध्ये ४०० व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी १५९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड ९०, वाघापूर ८, चांबळी ७, भिवरी ६, भिवडी, काळेवाडी ५, दिवे, खळद, ४, कोडीत ३, वाळुंज, पिंपळे, वनपुरी, गुरुळी, खानवडी, परिंचे, आंबोडी प्रत्येकी २, पिसवरे, पवारवाडी, मुंजवडी, सुपे, सोमर्डी, आंबळे, सिंगापूर, पिसर्वे, सोनोरी, हिवरे, उदाचीवाडी प्रत्येकी १ असे ग्रामीण भागातील ६७ तर तालुक्या बाहेरच्या २ रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ९३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ३० व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी ६, बेलसर ३, शेरेवाडी, साकुर्डे, वाल्हे, नाझरे (सुपे) प्रत्येकी २, भोसलेवाडी, कोळविहिरे, भोरवाडी, थोपटेवाडी, वाळुंज, पिंपरी मावडी, नाझरे (क.प), लवथळेश्वर, पारगाव मेमाणे असे २१ तर बारामती तालुक्यातील मोढवे २ व मुर्टी १ असे तालुक्याबाहेरचे ३ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
पुरंदर तालुक्यात दिवे व जेजुरी येथे कोविड केअर सेंटर आहेत. पण हे दोन्ही सेंटर क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांमुळे हतबल झाले आहे. गेली काही दिवस तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड शहरासह परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता सासवड व नीरा या शहरी भागात कोरोना केअर सेंटर व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. सासवड शहरात १००, तर नीरा शहरात ५० बेडचे कोरोना केअर सेंटर तालुका प्रशासनाने त्वरित सुरू करावे, अशी आता दोन्ही शहरांसह परिसरातील ग्रामीण भागातून होत आहे.