पुरंदर तालुक्यात ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:10+5:302021-05-25T04:12:10+5:30
पुरंदरच्या आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या एका रुग्णाचा सोमवारी ...
पुरंदरच्या आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या एका रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. केंद्रांतर्गत पाॅझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांपैकी सध्या १ हजार १५४ रुग्ण सक्रिय आहेत. जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ७९ संशयित रुग्णांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यापैकी १९ रुग्णांचे अहवाल बाधित आले. जेजुरी ९, हिवरे, वाल्हे २, सासवड, माळशिरस, पिंपरी, मांडकी, आंबळे येथील प्रत्येकी १ रुग्णांचा अहवाल बाधित आला. तालुक्याबाहेरील मुर्टी येथील १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सासवड ग्रामीण रुग्णालयात १८ संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. यापैकी सासवड येथील १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत परिंचे, नीरा, माळशिरस, बेलसर, वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन चाचणी तपासण्यात आल्या.
नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २८ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी नीरा ४, मांडकी ३, गुळुंचे १ रुग्णाचे अहवाल बाधित आले.
परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी वीर येथील १ रुग्णांचा अहवाल बाधित आला. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. माळशिरस येथील २ रुग्णांचे अहवाल बाधित आले.
बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात ७९ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी जवळार्जुन येथील १ रुग्णाचा अहवाल बाधित आला. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ संशयित रुग्णांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले.