पुरंदर तालुक्यातील ८५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:19+5:302021-03-30T04:08:19+5:30

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील लॅबमध्ये ६८ व्यक्तींचे, तर जेजुरी येथील लॅबमध्ये १७ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे ...

Reports of 85 persons in Purandar taluka are positive. | पुरंदर तालुक्यातील ८५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह.

पुरंदर तालुक्यातील ८५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह.

Next

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील लॅबमध्ये ६८ व्यक्तींचे, तर जेजुरी येथील लॅबमध्ये १७ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सासवड व जेजुरी येथील शासकीय लॅबमधील दि.२९ रोजी पुरंदर तालुक्यातील २४ गावांमधील २२९ संशयित रुग्णांपैकी ८५ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले असून, पुरंदर तालुक्यातील ८४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले असून, तालुक्याबाहेरील एक रूग्ण आहे.

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये सोमवार, दि. २९ रोजी १४७ व्यक्तींची कोरोना तपासणी केली. यापैकी ६८ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले .सासवड शहरांमधील ४६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच जेजुरी येथील शासकीय लॅबमधील ८२ रुग्णांचे कोरोना अहवाल तपासण्यात आले. यापैकी १७ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. .

सासवड येथील शासकीय लॅबमधील कोरोना चाचणीत सासवड येथील ४६, बेलसर, सोनेरी, दिवे,राजेवाडी, नीरा येथील प्रत्येकी २ रूग्ण, तसेच वनपुरी, वाल्हे, वाळुंज, जवळार्जुन, माळशिरस, पिसर्वे, काळेवाडी, भिवडी, चांबळी, भिवरी येथील प्रत्येकी एक रुग्ण, तसेच तालुक्या बाहेरील वारजे माळवाडी येथील एक असे एकूण ४६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

जेजुरी येथील शासकीय लॅबमधील कोरोना चाचणीतील १७ संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये जेजुरी १०, नीरा २, दोरगेवाडी, साकुर्डे, जवळार्जुन, पिंपरे (खुर्द), जेऊर येथील प्रत्येकी एका रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील मोठी लोकवस्तीत असलेले सासवड जेजुरी व नीरा शहरामध्ये ६० व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातीलही २४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

मागील आठवडय़ापासून तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्यात दिवे या ठिकाणी एकच कोविड सेंटर सुरू होते. जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या वतीने मागील वर्षी सुरू केलेले कोविड सेंटर रूग्ण संख्या कमी झाल्याने, मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आले होते. मात्र मागील आठवडय़ापासून पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या वतीने बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याबाबत . लोकमतच्या मध्यमातून पाठपुरावा केला होता. जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या वतीने (दि.३०) उद्यापासून मार्तंड कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Reports of 85 persons in Purandar taluka are positive.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.