पीएमपीला अनुदान देण्यासाठी फेरप्रस्ताव

By admin | Published: October 29, 2014 12:34 AM2014-10-29T00:34:19+5:302014-10-29T00:34:19+5:30

महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कामगारांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीच्या रकमेचा वर्गीकरणासह फेरप्रस्ताव द्यावा, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

Representation to PMP | पीएमपीला अनुदान देण्यासाठी फेरप्रस्ताव

पीएमपीला अनुदान देण्यासाठी फेरप्रस्ताव

Next

 पुणो : महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कामगारांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीच्या रकमेचा वर्गीकरणासह फेरप्रस्ताव द्यावा, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यामुळे पीएमपीला देण्यात येणा:या 5क् कोटींच्या अनुदानचा प्रस्तावही या प्रस्तावात असणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.        

 पीएमपीच्या तब्बल साडेअकरा हजार कर्मचा:यांना सहाव्या वेतना आयोगाच्या फरकापोटी 380 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. फरकापोटीच्या 380 कोटी रकमेपैकी पुणो महानगरपालिका 268 कोटी तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून उर्वरित 112 कोटी रुपये देण्यात येणार होते. महापालिकेच्या वाटय़ातील 268 कोटी रुपये रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून पन्नास कोटी रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या वर्गीकरणातून ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी यासाठी गेल्या महिन्याभरापूर्वी त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली.  फरकापोटीच्या रकमेचा वर्गीकरणासह फेरप्रस्ताव द्यावा, असा निर्णय स्थायी समितीने घेतला.
 
च्अकरा हजार कर्मचा:यांना 38क् कोटी रुपये फरकापोटी देण्याचा होता प्रस्ताव
च्आचारसंहितेमुळे मात्र ही रक्कम देण्यात आले विघ्न.
च्कर्मचा:यांनी आंदोलन करूनही दिवाळीपूर्वी हा निर्णय झाला नाही.
च्फेरप्रस्तावानंतर तरी रक्कम मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह.

Web Title: Representation to PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.