रिपब्लिकनकडून दौंडमध्ये १३० किलो लाडू वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:25+5:302021-04-18T04:10:25+5:30
-- गोरगरिबांना पुस्तक वाटप दौंड : दौंड येथे एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत अनिकेत मिसाळ यांच्या पुढाकाराने गोरगरिबांना ...
--
गोरगरिबांना पुस्तक वाटप
दौंड : दौंड येथे एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत अनिकेत मिसाळ यांच्या पुढाकाराने गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने एक बॉक्स ठेवण्यात आला होता. त्यामध्ये दानशूर व्यक्तींनी पुस्तके, कपडे, चप्पल, बूट जमा केले. दरम्यान जमा झालेल्या सर्व वस्तू गोरगरिबांना वाटप करण्यात आले. यावेळी अनिकेत मिसाळ, हिरालाल साळवे, प्रतीक वाघमारे, विकी सरवदे, आकाश झीजे, अभिषेक जाधव, ओंकार जगताप, विजय घेंगाठ, तुषार साळवे, महेश गायकवाड, अक्षय शिखरे, अक्षय मिसाळ, योगेश साळवे, सूर्यकांत धुमाळ, मोहन ओहळ, हृषीकेश दिघे, सुरज गावडे, उपस्थित होते.
--
बुद्धविहारात धम्मवंदना
दौंड : दौंड येथील राजगृह बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. यावेळी राजेश मंथने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने धम्मवंदना घेण्यात आली. सकाळी सात वाजता बुद्धविहारात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विविध वेशभूषा केलेले मुले आणि मुलींनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला. यावेळी राजेश मंथने, कांचनमाला धेंडे, शिल्पा मंथने, अंकीता डेंगळे, शिल्पा शिदगाणे, निशा भालेराव, अनिल धेंडे, जगदीश शिदगणे, प्रवीण सगळगिळे, जमशेद ठाणेदार यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रम झाले.
--
संविधान स्तंभाला वंदन
--
दौंड : येथील जुन्या तहसील कचेरी जवळील संविधान स्तंभाला वंदन करण्यात आले. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेलचे अध्यक्ष दिपक सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, गुरमुख नारंग, इंद्रजीत जगदाळे, ॲड. अजित बलदोटा , प्रा. डॉ. भीमराव मोरे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १७दौंड लाडू वाटप
फोटो ओळी : दौंड येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने १३० किलो लाडू वाटप करताना कार्यकर्ते