पुण्यातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी एक मीटर साइड मार्जिनची अट काढा- रविंद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:47 PM2023-07-28T20:47:22+5:302023-07-28T20:50:02+5:30
कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी....
पुणे : एकीकडे पुण्याचा झपाट्याने विकास होत आहे. त्याचवेळी वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मात्र रखडलेलाच आहे. त्याचे मुख्य कारण एक मीटर साइड मार्जिनची अट आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना विधानसभेत केली.
जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा लावून धरला आहे. पुण्याच्या ११ पेठांमध्ये २ हजार २३२ वाड्यांची नोंद असून, बांधकाम नियमावलीतील त्रुटी, मालक भाडेकरू वाद आदी कारणांमुळे या वाड्यांच्या विकासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य अडचणीचा मुद्दा हा एक मीटर साईड मार्जिनचा आहे. या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी शासनाने महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडवावा. ही समस्या शहराच्या पूर्व भागात मोठी आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.