आवश्यकता २५०० कर्मचाऱ्यांची
By admin | Published: April 15, 2015 01:01 AM2015-04-15T01:01:50+5:302015-04-15T01:01:50+5:30
पुण्यातील लोकसंख्या पाहता अग्निशामक दलाच्या केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.
प्रशांत रणपिसे : सुरक्षेसाठी शहरात २५ अग्निशामक दले हवीत
हडपसर : पुण्यातील लोकसंख्या पाहता अग्निशामक दलाच्या केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.
डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात अग्निशमन साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सध्या ११ केंद्र आहेत तर ३ केंद्रांच्या इमारती बांधून पूर्ण असल्या तरी त्या हस्तांतरित झालेल्या नाहीत. ४ जागांवर आरक्षण असले तरी तेथे केंद्र उभारण्याची गरज आहे. पुण्यातील ११ केंद्रांमध्ये एकूण ५२५ कर्मचारी आहेत. २५ केंदे्र झाल्यास संपूर्ण पुण्यात सेवा देण्यास अग्निशामक दल सज्ज होऊ शकते. या २५ केंद्रांसाठी सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.’’
आग विझविताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो. महापालिका अग्निशमन दलाच्या भवानी पेठ येथील मुख्यालयामध्ये परेड होवून रणपिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.(वार्ताहर)
अग्निशामक साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन
४डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात भरविण्यात आलेल्या अग्निशमन साहित्य व उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन २० एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत नागरिकांना पाहता येणार आहे.
जागा हस्तांतरित कराव्यात
४महापालिकेलगत असलेल्या गावाचा होणारा विस्तार पाहता नवीन केंद्र उभारण्याची सध्या गरज आहे. शहरात आता जागा शिल्लक राहिल्या नसल्याने सुरक्षेसाठी अशा जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्येक जवान आपली सेवा बजावण्यासाठी कायम तत्पर असतात. पालिकेने अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी तयार असलेल्या इमारती हस्तातंरित कराव्यात अशी अपेक्षा आहे.