साठ फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:56+5:302021-02-06T04:16:56+5:30
रेस्क्यू टीम सदस्य शांताराम गाडे यांना आंबेठण येथून एका शेतकऱ्याचा फोन आला की, शेतातल्या विहिरीत दोन दिवसांपासून एक कुत्रा ...
रेस्क्यू टीम सदस्य शांताराम गाडे यांना आंबेठण येथून एका शेतकऱ्याचा फोन आला की, शेतातल्या विहिरीत दोन दिवसांपासून एक कुत्रा पडला आहे. एकंदरीत विहिरीत उतरून त्याला चुचकारून चुचकारून ताब्यात घेऊन वर काढून मुक्त करणे आव्हान होते. कारण विहिरीला पायऱ्या नव्हत्या, झाडेझुडपे वाढल्याने उतरणे अवघड होते, एक दोघांचे काम नसल्याने रेस्क्यू टीमचे बापूसाहेब सोनवणे, हितेश घुगरे, आकाश दवणे आदींच्या मदतीने विहिरीच्या कपारीत बसलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी दोन दोर टाकले परंतु ते त्याने चावून टाकले. त्यामुळे विहिरीत उतरूनच त्याला बाहेर काढणे हा एकच मार्ग होता.
रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मोठे धाडस करून दोराच्या साह्याने विहिरीत उतरले. मात्र दोन दिवस अडकल्यामुळे चवताळून भूकंत होता, मात्र कुत्रा पिसाळलेला नव्हता हे लक्षात आल्यावर त्याच्या समोर पाव, बिस्किटे टाकून पाणी डोक्यावर टाकण्यात आले. मग कुत्र्याच्या नजरेत मैत्री आणि विश्वासाची छटा तरळली आहे हे लक्षात येताच, अनेक युक्त्या क्लृप्त्या वापरून, त्याला चुचकारून शेवटी अडीच तास प्रयत्नांनी त्याला वर काढण्यात यश मिळाले.
०४ आंबेठाण
विहिरीत पडलेल्या कुत्र्याला बाहेर काढताना रेस्क्यू टीमचे सदस्य.