अग्निशमन दलाच्या जवानांनी वयोवृद्ध महिलेची 'या' संकटातून केली सुखरूप सुटका; सहकारनगरमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 01:02 PM2021-01-01T13:02:38+5:302021-01-01T13:04:09+5:30

या ज्येष्ठ महिला घरात काम करताना अचानक पडल्याने त्यांना उठणे शक्य नव्हते व आवाजाला प्रतिसादही देऊ शकत नव्हत्या..

rescue elderly woman in critical condition by fire brigade soldiers; Incidents in Sahakarnagar | अग्निशमन दलाच्या जवानांनी वयोवृद्ध महिलेची 'या' संकटातून केली सुखरूप सुटका; सहकारनगरमधील घटना 

अग्निशमन दलाच्या जवानांनी वयोवृद्ध महिलेची 'या' संकटातून केली सुखरूप सुटका; सहकारनगरमधील घटना 

Next

पुणे : सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीमध्ये एक ज्येष्ठ महिला घराच्या दाराची कडी आतमधून अडकली होत्या. या महिलेकडून बराच वेळ कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी या घटनेची माहिती अग्निशमन नियंञण कक्षाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जनता वसाहत येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले.त्यानंतर त्यांनी सुखरूप या महिलेची संकटातून सुटका केली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाच्या नियंञण कक्षाला सहकारनगर भागात एक वयोवृद्ध महिला दाराची कडी लॉक झाल्याने आत अडकल्याची माहिती देणारा फोन आला होता. तातडीने या घटनेची माहिती जनता वसाहत अग्निशमन केंद्राला कळविण्यात आली. तसेच पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या अडकलेल्या महिलेची माहिती घेत पहिल्या मजल्यावर शिडी लावून पाहणी केली. त्यात त्या पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्या. यानंतर जवानांनी क्षणाचाही विलंब न करता खिडकी जवळच असलेली लोखंडी जाळी कटरच्या साह्याने कापत त्या घरात प्रवेश करत व कडी उघडून महिलेची सुखरूप सुटका केली. याठिकाणी या ज्येष्ठ महिला घरात काम करताना अचानक पडल्याने त्यांना उठणे शक्य नव्हते व आवाजाला प्रतिसादही देऊ शकत नव्हत्या. तरीदेखील अग्निशामक दलाच्या जवानांनी शिताफीने या महिलेची सुटका केली. 

स्थानिकांनी नागरिकांनी अग्निशामक दलाचे जवान महेंद्र सकपाळ, संदिप घडशी व शैलेश गोरे तसेच वाहन चालक ॠषीकेश बिबवे यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले व तसेच वेळेत मदत मिळाल्याने आभार देखील व्यक्त केले.  

Web Title: rescue elderly woman in critical condition by fire brigade soldiers; Incidents in Sahakarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.