CoronaVirus News: ऑक्सफर्डबरोबरच भारतीय लसीसाठीही ‘सीरम’चे संशोधन; पूनावाला यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 01:23 AM2020-07-22T01:23:44+5:302020-07-22T06:37:05+5:30
फिक्की फ्लो पुणे चॅप्टरतर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुनावाला बोलत होते. सबिना संघवी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पुणे : कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठातील लसीसोबतच आणखी चार लसींसाठी सीरम इन्स्टिट्यूटने करार केले आहेत. सीरमने भारतीय संशोधकांच्या मदतीने संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘कोवॅक्स’ लसीवर काम सुरू केले. या लसीबरोबर ऑक्सफर्डच्या लसीची तुलना करून अंतिम चाचणी घेतली जाईल आणि डिसेंबर महिन्यात लस प्रत्यक्षात उपलब्ध होईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी मंगळवारी दिली.
फिक्की फ्लो पुणे चॅप्टरतर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुनावाला बोलत होते. सबिना संघवी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या राष्टय अध्यक्षा जानबी पुखन आणि पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांनी स्वागत केले. पूनावाला म्हणाले, ‘सीरम‘ने करार केलेल्या वेगवेगळ््या पाच ठिकाणी लस विकसित करण्याचे काम चालू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ संशोधनात सर्र्वात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर युगोस्लाव्हियातील प्रकल्प आहे. पोलिओ लस तेथे विकसित झाली होती. तेथील लस दुसºया टप्प्यात आहे. त्यात यश मिळाल्यास आॅस्ट्रियातील प्रकल्पात या लसींचे उत्पादन होईल आणि त्या भारतात आणल्या जातील. अमेरिकेतील एका कंपनीसोबत ‘कोव्हिवॅकस’ लसीसंदर्भात करार झाला आहे.
याशिवाय, सीरमने भारतीय संशोधकांच्या मदतीने ‘कोवॅक्स’ लसीवर काम सुरू केले. ही लस पूर्णत: भारतीय बनावटीची असेल. सीरममध्ये २ अब्ज डोसचे उत्पादन केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘बीसीजी’ची लस अत्यंत फायदेशिर ठरू शकते. आपण लहानपणी एकदा ही लस घेतल्यावर पुन्हा घेत नाही. मात्र, आता दुसरा डोस घेतल्यावर त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून संसर्गाची लढण्याची ताकद मिळू शकते, असा दावा सायरस पूनावाला यांनी केला.