बालरंगभूमीचा इतिहास लिहिण्यासाठी संशोधन व्हावे - परिसंवादातील सूर : ‘बालरंगभूमी...आमची भूमिका आमची अपेक्षा’ विषयावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:46+5:302021-04-02T04:11:46+5:30

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे ‘बालरंगभूमी...आमची भूमिका आमची अपेक्षा’ या विषयावर ऑनलाइन परिसंवाद गुरूवारी घेतला. बाल रंगभूमी ...

Research should be done to write the history of children's theater - the tone of the seminar: discussion on 'Children's theater ... our role, our expectations' | बालरंगभूमीचा इतिहास लिहिण्यासाठी संशोधन व्हावे - परिसंवादातील सूर : ‘बालरंगभूमी...आमची भूमिका आमची अपेक्षा’ विषयावर चर्चा

बालरंगभूमीचा इतिहास लिहिण्यासाठी संशोधन व्हावे - परिसंवादातील सूर : ‘बालरंगभूमी...आमची भूमिका आमची अपेक्षा’ विषयावर चर्चा

googlenewsNext

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे ‘बालरंगभूमी...आमची भूमिका आमची अपेक्षा’ या विषयावर ऑनलाइन परिसंवाद गुरूवारी घेतला.

बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकाद्वारे परिसंवादाची सुरुवात केली. उपाध्यक्ष राजू तुलालवार यांनी बालरंगभूमीची परिषदेने मान्य केलेली व्याख्या सांगताना, बालनाट्यासोबत बालसंगीत, बालनृत्य, जादू, बाहुल्यांचे खेळ, शॅडो प्लेसारखे विविधांगी खेळ हे बालरंगभूमीचा भाग असल्याचे सांगितले. बालरंगभूमीचे फायदे अधिकाधिक बालकलाकार आणि बालप्रेक्षक यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी परिषदेच्या जिल्हा शाखांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

मराठी बाल रंगभूमीचा इतिहास लिहिला जावा, असे सांगून त्यासाठी परिषदेने संशोधनास चालना देण्याचे आवाहन संजय पाटील (बीड) यांनी केले. बाल नाट्याची दिशा वयोगटाप्रमाणे ठरवून, तालुका स्तरावर बालनाट्य टिकविण्याचे कार्यक्रम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

त्र्यंबक वडस्कर (परभणी) म्हणाले की, परभणी शाखेतर्फे मुलांचा सहभाग असणारीच नाटके बसवतो. मुलांचा सहभाग असेल असेच कार्यक्रम सादर करतो. सध्या नाट्यगृह उपलब्ध नसताना मुलांच्या 5 मिनिटांच्या नाटुकल्या मोबाईलवर रेकॉर्ड वरून प्रसारित करण्यात याव्यात.

प्रबोध कुलकर्णी (ठाणे) यांनी विविध स्पर्धांद्वारे मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांना या चळवळीत सामील करून घ्यावे, असा विचार मांडला.

प्रसाद भणगे (नगर) यांनी नगर जिल्हा शाखेने घेतलेल्या विविध स्पर्धा, शिबिरांची माहिती दिली. जिल्ह्यात ग्रीप्स थिएटरची संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध बाल महोत्सव आणि संमेलन यांद्वारे तालुका स्तरावरील मुलांना बालनाट्य चळवळीत सामावून घेतले जावे, असे आवाहन नगर शाखेच्या ऊर्मिला लोटके यांनी केले.

संजय रहाटे (नागपूर) यांनी सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. त्यांना मुलांचा चांगला प्रतिसाद मिळतो, असे आवर्जून सांगितले.

मुख्य शाखा सर्वांना अपेक्षित मदत करेल असे आश्वासन कार्यवाह सतिश लोटके यांनी दिले.

परिसंवादात डॉ. दीपा क्षीरसागर (बीड), विनोद ढगे (जळगाव), रवी कुलकर्णी (औरंगाबाद), सुजय भालेराव (धुळे), मंदार टिल्लू (ठाणे) सहभागी झाले होते.

Web Title: Research should be done to write the history of children's theater - the tone of the seminar: discussion on 'Children's theater ... our role, our expectations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.